तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, त्यामुळे डीएमडीकेने नवी मोट बांधली आहे. पक्षाने आगामी निवडणूक डीएमकेसोबत आघाडीत लढण्याची घोषणा केली आहे. २०२४ मध्ये झालेली लोकसभेची निवडणूक डीएमडीकेने एआयडीएमके पक्षासोबत लढवली होती.
२०२१ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक डीएमडीके पक्षाने स्वबळावर लढवली होती. पण, पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. यावेळी पक्षाने मूळं रुजवण्यासाठी डीएमकेसोबत आघाडी केल्याची चर्चा आहे.
लोकसभेला लढवल्या होत्या पाच जागा
२०२४ डीएमडीकेने एआयडीएमकेच्या नेतृत्वाखाली आघाडीत लढताना पाच जागांवर उमेदवार दिले होते. एकही जागा जिंकता आली नाही. पक्षाचे अस्तित्व आणि विधानसभा निवडणुकीत कामगिरी सुधारण्याचे आव्हान आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाने आता प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.
एप्रिल-मे महिन्यात तामिळनाडूमध्ये निवडणुका लागण्याचा अंदाज आहे. या निवडणुकीसाठी भाजपानेही कंबर कसली आहे. मात्र, त्याआधीच भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या एआयडीएमकेला हा झटका मानला जात आहे.
डीएमडीकेचे कोणत्या मतदारसंघात प्राबल्य?
मागील १५ वर्षांपासून डीएमडीके एआयडीएमकेसोबत आहे. मध्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली, पुदुक्कोट्टई, विरुधाचलम, ऋषिवंदियम, कल्लाकुरिची आणि उलुंदुरपेट या भागांमध्ये या पक्षाचे व्होट बँक आहे. २०११ मध्ये या पक्षाला २९ जागांसह ७.९ टक्के मते मिळाली होती. पण, २०१६ आणि २०२१ मध्ये पक्षाला एकही जागा मिळाली नाही.
Web Summary : Ahead of Tamil Nadu elections, DMDK partners with DMK after leaving AIADMK. DMDK aims to revive its political presence after struggling in past elections, hoping to gain ground with this alliance in the upcoming polls.
Web Summary : तमिलनाडु चुनाव से पहले, DMDK ने AIADMK छोड़ने के बाद DMK के साथ साझेदारी की। DMDK का लक्ष्य पिछले चुनावों में संघर्ष के बाद अपनी राजनीतिक उपस्थिति को पुनर्जीवित करना है, और आगामी चुनावों में इस गठबंधन से जमीन हासिल करने की उम्मीद है।