शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सेवेप्रति पोलिसांची अटल बांधीलकी शौर्याच्या खऱ्या भावनेचे प्रतीक: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 05:38 IST

आव्हानात्मक परिस्थितीत नागरिकांना मार्गदर्शन करून सुरक्षा सुनिश्चित करणारे ते भक्कम आधारस्तंभ आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आव्हानात्मक परिस्थितीत नागरिकांना मार्गदर्शन करून सुरक्षा सुनिश्चित करणारे ते भक्कम आधारस्तंभ आहेत. सेवेप्रतिची त्यांची अटल बांधीलकी शौर्याच्या खऱ्या भावनेचे प्रतीक आहे. ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व पोलिस जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पोलिस स्मृती दिना’च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पोलिसांचे त्यांच्या समर्पणाबद्दल कौतुक केले. १९५९ मध्ये याच दिवशी लडाखमधील हॉट स्प्रिंगमध्ये  चीनच्या सुरक्षा दलांशी लढताना १० शूर पोलिसांनी प्राणांची आहुती दिली होती. त्याची स्मृती म्हणून २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो.

दहशतवाद, घुसखोरीत ६५ टक्के घट : अमित शाह

ईशान्य तसेच जम्मू आणि काश्मिरातील दहशतवाद, नक्षलवाद आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये ६५ टक्के घट झाली असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे सांगितले. देशातील स्फोटक बिंदू असलेल्या नक्षलग्रस्त राज्ये, ईशान्येतील राज्ये, जम्मू व काश्मिरात आता शांतता प्रस्थापित होत आहे, असेही ते म्हणाले. पोलिस स्मृती दिनानिमित्त येथील राष्ट्रीय पोलिस स्मारकात शहीद जवानांना आदरांजली अर्पण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिस