शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : पोलीस स्टेशनमध्ये अधिका-याच्या खुर्चीत बसली राधे माँ, SHO गळयात चुनरी घालून हात जोडून उभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 12:49 IST

दोन वेगवेगळया प्रकरणात आरोपी असलेली स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ ला दिल्ली पोलिसांनी स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देराधे माँ चा दरबार भरतो तेव्हा तिचे भक्तगण लाल चुनरी गळयात घालून फिरत असतात.राधे माँ पोलीस स्टेशनमध्ये एसएचओ अधिका-याच्या खुर्चीवर बसली आहे आणि अधिकारी हात जोडून तिच्या शेजारी उभा आहे. 

नवी दिल्ली - दोन वेगवेगळया प्रकरणात आरोपी असलेली स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ ला दिल्ली पोलिसांनी स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचे समोर आले आहे. हुंडयासाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या राधे माँ ची दिल्लीच्या विवेक विहार पोलीस स्टेशनमध्ये शाही बडदास्त ठेवण्यात आली. विवेक विहार पोलीस स्थानकाचे स्टेशन हाऊस अधिकारी यांनी चक्क आपली खुर्ची राधे माँ ला बसण्यासाठी दिली तसेच  तिने दिलेली लाल चुनरी आपल्या गळ्यात घातली. 

राधे माँ चा दरबार भरतो तेव्हा तिचे भक्तगण लाल चुनरी गळयात घालून फिरत असतात. पूर्व दिल्लीतील पोलीस स्टेशनमध्ये फुल उधळून राधे माँ चे स्वागत करण्यात आले. राधे माँ पोलीस स्टेशनमध्ये एसएचओ अधिका-याच्या खुर्चीवर बसली आहे आणि अधिकारी हात जोडून तिच्या शेजारी उभा आहे. 

हुंडयासाठी छळ केल्याच्या प्रकरणात आरोपींच्या यादीतून आपले नाव वगळावे यासाठी राधे माँ ने मागच्या महिन्यात याचिका दाखल केली होती. पण मुंबईतील कोर्टाने तिची याचिका फेटाळून लावली. मुंबईतील रहिवाशी निक्की गुप्ताने 2016 मध्ये दाखल केलेल्या तक्रारीत आरोपींच्या यादीत राधे माँ चे ही नाव दिले होते. 

दोन वर्षांपूर्वी या प्रकरणी तक्रार दाखल झाली. आध्यात्मिक गुरू राधे माँ उर्फ सुखविंदर कौरने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. आपण निर्दोष असल्याचे सांगताना तिने प्रसारमाध्यमे आणि पोलिसांकडून आपला छळ होत असल्याची मुक्ताफळे उधळली होती. आपल्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने केला होता.

भक्त मला श्रेय देतातस्वत:ला दुर्गादेवीचा अवतार समजणाऱ्या राधे मॉँला त्याबाबत विचारणा केली असता, ती म्हणाली, माझ्याकडे येणाऱ्या भक्तांसाठी मी प्रार्थना करते, देव त्यांची इच्छापूर्ती करतो. मात्र भक्त त्याचे श्रेय मला देतात, हे भक्तांचे आपल्यावरील प्रेम आहे, असे मी मानते. 

टॅग्स :Radhe Maaराधे माँ