शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

निजाम संग्रहालयातून चोरी झालेल्या वस्तू पोलिसांनी केल्या हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 03:58 IST

निजाम संग्रहालयातून चोरी झालेला हिरेजडित टिफिन बॉक्स, माणिक जडविलेले कप व बशी, तसेच चमचा, अशा कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान वस्तू पोलिसांनी पुन्हा हस्तगत केल्या आहेत

हैदराबाद : येथील निजाम संग्रहालयातून चोरी झालेला हिरेजडित टिफिन बॉक्स, माणिक जडविलेले कप व बशी, तसेच चमचा, अशा कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान वस्तू पोलिसांनी पुन्हा हस्तगत केल्या आहेत. या चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, या सर्व वस्तू शेवटचा व सातवा निजाम नवाब उस्मान अली खान बहादूर यांच्या मालकीच्या होत्या. २ सप्टेंबर रोजी या वस्तूंच्या झालेल्या चोरीचा छडा लावण्यासाठी हैदराबाद पोलिसांनी १५ विशेष पथके तयार केली होती. चेहरा झाकून घेतलेल्या दोन व्यक्ती पुरानी हवेली येथील या संग्रहालयातून बाहेर पडत असल्याचे व तेथून मोटरसायकलवरून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर झळकले होते. या चोरीमध्ये किमान दोन व्यक्तींचा हात असावा, असा पोलिसांचा संशय होता. त्यातील एकाने वस्तू ठेवलेल्या दालनातील झरोक्याची लाकडी चौकट मोडून आत प्रवेश केला होता. (वृत्तसंस्था)>सोन्याच्या डब्यात जेवण!निजामाचा हा डबा चोरणाºयापैकी एक जण रोज त्यात जेवण करायचा, असे पोलिसांना तपासात समजले. डबा चोरल्यानंतर चोर मुंबईला पोहोचले व लक्झरी हॉटेलमध्ये ते थांबले. ही चोरी शोधण्यासाठी पोलिसांची पथके तयार होती.>निजामाच्या नातवाचे पोलिसांना पत्रनिजाम संग्रहालयामध्ये शेवटच्या निजामाच्या वडिलांच्याही अनेक मौल्यवान वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तेथून चोरीला गेलेल्या वस्तूंचा लवकरात लवकर शोध लावण्यात यावा, असे पत्र शेवटच्या निजामाचा नातू व निजाम फॅमिली वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष नवाब नजफ अली खान यांनी हैदराबाद पोलीस आयुक्त अंजनीकुमार यांना गेल्या आठवड्यात लिहिले होते. संग्रहालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबद्दलही या पत्रात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.