शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हत्याकांड : आणखी ३ पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 04:17 IST

विकास दुबेच्या गुंडांनी गेल्या आठवड्यात कानपूरजवळच्या बिकरू खेड्यात आठ पोलिसांना ठार मारले होते. त्या हत्याकांडानंतर दुबे बेपत्ता असून, त्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस २.५ लाख रुपये केले आहे.

कानपूर/लखनौ : कुख्यात गुंड विकास दुबे याला नियोजित कारवाईची माहिती दिल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी तीन पोलिसांना निलंबित केले आहे. विकास दुबेच्या गुंडांनी गेल्या आठवड्यात कानपूरजवळच्या बिकरू खेड्यात आठ पोलिसांना ठार मारले होते. त्या हत्याकांडानंतर दुबे बेपत्ता असून, त्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस २.५ लाख रुपये केले आहे.उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक एच. सी. अवस्थी म्हणाले, ‘‘आम्हाला मिळालेल्या माहितीवरून दुबेला शोधण्यात येत आहे. पोलिसांनी या आधी चौबेपूर पोलीस ठाण्याचा अधिकारी विनय तिवारी याला निलंबित केले. दुबे याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ६० गुन्हे दाखल आहेत.’’ तीन जुलैच्या रात्री दुबेच्या टोळीतील लोकांनी गनिमी काव्याने हल्ला करून आठ पोलिसांना ठार मारले व सात जणांना जखमी केले. नियोजित धाडीची माहिती दुबेपर्यंत पोहोचवली असण्याच्या संशयावरून तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात उपनिरीक्षक कुंवरपाल आणि कृष्णकुमार शर्मा आणि कॉन्स्टेबल राजीव यांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.राजकीय नेत्यांशी संबंधांचा विकास दुबेने केला दावालखनौ : कुख्यात गुंड विकास दुबे याने तारीख उपलब्ध नसलेल्या एका व्हिडिओ मुलाखतीत माझे राजकीय गुरू हे उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष हरी शंकर श्रीवास्तव हे असून त्यांनीच मला राजकारणात पुढे केले, असे म्हटले. श्रीवास्तव हे राज्यात १९९०-१९९१ मध्ये मुलायमसिंह यादव यांचे सरकार असताना सभागृहाचे अध्यक्ष होते.व्हिडिओत दुबे याने म्हटले की, ‘माझा गुन्हे आणि गुन्हेगारांशी काहीही संबंध नाही. माझ्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे हे माझी लोकप्रियता माझ्या विरोधकांना सहन न झाल्याचा परिणाम आहे.’ स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) आणखी एक व्हिडिओ मिळवला असून त्यात दुबे हा भाजपचे आमदार अभिजित सांगा आणि भगवती सागर यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल बोलताना दिसला. अभिजित सांगा आणि भगवती सागर यांनी मला २०१७ मध्ये माझ्यावर पोलीस कारवाई होत असताना मदत केली होती, असे तो म्हणाला. दुबे याचे हे म्हणणे सांगा यांंनी स्पष्टपणे फेटाळून लावले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी