शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ईशा फाउंडेशन प्रकरणी पोलिस चौकशीस स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 06:20 IST

दोन महिलांच्या वडिलांनी दाखल केलेली हेबिअस कॉर्पस याचिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्वत:कडे हस्तांतरित केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंंडेशनचा तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे आश्रम आहे. तिथे दोन महिलांना त्यांच्या मर्जीविरोधात राहाण्यास भाग पाडले आहे, असा आरोप असून, त्या अनुषंगाने पोलिस करत असलेल्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. 

या दोन महिलांच्या वडिलांनी दाखल केलेली हेबिअस कॉर्पस याचिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्वत:कडे हस्तांतरित केली होती. ईशा फाउंडेशन प्रकरणी चौकशी करावी या मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिली. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या या खंडपीठाने सांगितले की, उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबरच्या आदेशात दिलेल्या आदेशानुसार पोलिस या प्रकरणाचा स्थितीदर्शक अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करू शकतात. 

ईशा फाउंडेशनच्या विरोधात नोंदवलेल्या सर्व प्रकरणांचा सविस्तर तपशील कोइम्बतूर पोलिसांनी पुुढील कारवाईसाठी सादर करावा, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.

पुढील सुनावणी १८ ऑक्टोबरलाnईशा फाउंडेशनची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी म्हणाले की, या संस्थेच्या आश्रमात १५० पोलिसांनी प्रवेश केला. आश्रमातील कानाकोपऱ्यात जाऊन पोलिसांनी तपासणी केली. nया आश्रमात आम्ही आमच्या मर्जीने राहात आहोत, असे या याचिकेत नमूद केलेल्या दोन महिलांनी खंडपीठाला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सांगितले होते. त्याचीही नोंद सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घेतली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.nतुम्ही लष्कर किंवा पोलिसांना अशा ठिकाणी प्रवेश करू शकत नाही, असे सरन्यायाधीश म्हणाले.