शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशात सापडले 10 कापलेले हात; परिसरात घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 15:37 IST

परिसरात मोठा फौजफाटा तैनात

जाजपूर: ओडिशाच्या जाजपूरमध्ये दहा कापलेले हात सापडल्यानं एकच घबराट पसरली आहे. 2006 मध्ये या भागात पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या आदिवासींवर गोळीबार केला होता. हे हात त्याच आंदोलकांचे असावेत, अशी शक्यता प्राथमिक तपासातून समोर आली आहे. सध्या या परिसरात दहशतीचं वातावरण असल्यानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. कलिंगा नगरमधील स्टिल कारखान्यासाठी जानेवारी 2006 मध्ये जमिनीचं अधिग्रहण सुरू असताना त्याविरोधात स्थानिक आदिवासींनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये 13 पेक्षा अधिक आदिवासींचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृत्यूमुखी पडलेल्या आदिवासींचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यावेळी पाच मृतदेहांची ओळख पटली नव्हती. त्यामुळे त्यांचे हात कापून त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आदिवासींच्या कुटुंबियांना मृतदेहांचे हात परत देण्यात आले. मात्र त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी या हातांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे हे हात एका मेडिकल बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. शनिवारी काहीजणांनी क्लबची खिडकी तोडली आणि त्यांनी मेडिकल बॉक्स पळवला, अशी माहिती एसपी सी. एस. मीना यांनी दिली. त्या मेडिकल बॉक्समध्ये दहा हात ठेवण्यात आले होते. हात पळवणाऱ्या माणसांनी ते जाजपूरमध्ये नेऊन फेकले. स्थानिक लोकांना हे हात सापडल्यावर एकच खळबळ उडाली. त्यामुळे पोलिसांनी या भागात मोठा फौजफाटा तैनात केला. मात्र अद्याप या प्रकरणी एफआयआर दाखल झालेला नाही.  

टॅग्स :Suicideआत्महत्याOdishaओदिशा