शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आझम खान यांच्या अडचणीत वाढ, आणखी 13 प्रकरणांत चार्जशीट दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 08:43 IST

समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

रामपूरः समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात 13 प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल केली आहे. तसेच माजी खासदार जया प्रदाही कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत. त्यांच्याविरोधातही सहा चार्जशीट दाखल झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान आझम खान यांनी पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांनी शाहबादमध्ये एका जनसभेला संबोधित करतानाही जया प्रदा यांच्याबद्दल अश्लील टिपण्णी केली होती.या प्रकरणातही कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांनी कानपूरमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ते प्रकरणात रामपूर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर बंदी घातली असतानाही ते वादग्रस्त विधानं करतच होते. निवडणूक आयोगानं त्यांच्याविरोधात आचारसंहितेचं उल्लंघन आणि वादग्रस्त भाषणबाजीसंदर्भात जवळपास 15 खटले दाखल केले आहेत. पोलिसांनी चौकशी पूर्ण केली आझम खानविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.  

  • जया प्रदाविरोधात आरोपपत्र दाखल

माजी खासदार आणि चित्रपट अभिनेत्री जया प्रदा लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार होत्या. निवडणुकीदरम्यान त्यांच्याविरोधात सहा गुन्हा दाखल झाले आहेत. त्यांच्यावर मुलांना ट्राफी वाटणं आणि दहा रुपये देण्याचा आरोप आहे. पोलिसांनी चौकशीनंतर आरोपपत्र दाखल केलं आहे. 

  • संसदेत महिलांसंदर्भात केलं वादग्रस्त विधान

लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीचे खासदार आजम खान यांच्या विधानानं वाद झाला होता. तिहेरी तलाकवर चर्चा सुरू असताना रामपूर मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या निवडून आलेले खान बोलायला उभे राहिले. त्यांनी ‘तू इधर-उधर की ना बात कर…’ असा शेर म्हणत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भाजपाच्या खासदार रमा देवी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. 'आप मुझे इतनी लगती है की मेरा मन करता है की आप की आँखो में आँखे डाले रहूँ' असं आझम खान यांनी म्हणताच लोकसभेत गदारोळ झाला होता.