शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

CAA: मोदींच्या गुजरातमध्ये विरोधाचे पतंग गुल; उडवण्यापूर्वीच पोलिसांकडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 10:15 AM

विद्यापीठात घुसून पोलिसांची कारवाई; विद्यार्थ्यांकडून शांततापूर्वक निषेध

अहमदाबाद: सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, जामिया विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापाठ यांच्यापाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमधील विद्यार्थ्यांनीदेखील सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) विरोध केला आहे. सीएएला विरोध दर्शवण्यासाठी गुजरात विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी या कायद्याविरोधात मजकूर असलेले पतंग उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्याकडे असणारे पतंग ताब्यात घेतले. महात्मा गांधींनी भूमिपूजन केलेल्या गुजरात विद्यापीठात मकरसंक्रांत उत्साहात साजरी केली जाते. विद्यार्थी मोठ्या संख्येनं पतंग उडवतात. काल (मंगळवारी) काही विद्यार्थ्यांनी पतंग उडवण्याची तयारी सुरू केली. यापैकी काही विद्यार्थ्यांच्या पतंगावर सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातल्या घोषणा होत्या. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच विद्यापीठ परिसर गाठला. 

विद्यार्थी पतंग उडवण्याच्या तयारीत असताना पोलीस विद्यापीठात दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना पतंग उडवण्यापासून रोखलं. विद्यापीठातल्या पोलिसांच्या प्रवेशाचा विद्यार्थ्यांनी विरोध केला. विद्यापीठात पोलिसांनी केलेला प्रवेश घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी शांततापूर्वक आंदोलन केलं. सीएएच्या समर्थनार्थ घोषणा असलेली पतंग खुद्द गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी उडवू शकतात. मग आम्ही त्याच माध्यमातून आमचा निषेध का व्यक्त करू शकत नाही, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा