पोलीस कर्मचार्याने दुचाकीस्वाराला बदडले
By admin | Updated: February 3, 2016 00:28 IST
जळगाव: शिवीगाळ केल्याच्या संशयावरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील ललित पाटील या कर्मचार्याने मयुर नितीन जोशी (रा इंद्रप्रस्थ नगर) या तरुणानाला मंगळवारी संध्याकाळी टागोर नगर परिसरात बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. याबाबत तरुणाने पोलीस स्टेशन गाठून निरीक्षकांकडे तक्रार केली.
पोलीस कर्मचार्याने दुचाकीस्वाराला बदडले
जळगाव: शिवीगाळ केल्याच्या संशयावरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील ललित पाटील या कर्मचार्याने मयुर नितीन जोशी (रा इंद्रप्रस्थ नगर) या तरुणानाला मंगळवारी संध्याकाळी टागोर नगर परिसरात बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. याबाबत तरुणाने पोलीस स्टेशन गाठून निरीक्षकांकडे तक्रार केली.मयुर व त्याचे दोन मित्र रिंगरोडकडून रस्त्याने तीन सीट जात होते. त्याच वेळी ललित पाटील हे समोरुन येत असताना मयुरने आपल्याला शिवीगाळ केल्याचा संशयाने मागे दुचाकी वळवून त्यांना टागोर नगरजवळच्या गल्लीत अडविले. कोणतीही चौकशी न करता मयुरला मारहाण करायला सुरुवात केली. आम्ही तुम्हाला काही बोललोच नाही अशी विनवणी करुनही पाटील यांनी त्यांचे एकले नाही. पोलीस स्टेशनला आणून तीन सीट दुचाकी चालविली म्हणून त्याच्यावर कारवाई केली. प्रकरण अंगाशी येण्याच्या भीतीने अन्य कर्मचार्यांनी मयुर व त्याच्या वडीलांची समजूत काढली. दरम्यान, ललित पाटील यांच्याबाबतीत अनेम तक्रारी असल्याने त्यांना गुन्हे शोध पथकातून काढण्यात आल्याचे निरीक्षक शाम तरवाडकर यांनी सांगितले.