तोतया पोलिसांचा शहरात धुमाकूळ
By admin | Updated: June 2, 2014 08:56 IST
दोन महिलांना लुटले
तोतया पोलिसांचा शहरात धुमाकूळ
दोन महिलांना लुटलेनाशिक : पोलीस असल्याची बतावणी करून दोघांनी एका महिलेला लुटल्याची घटना औरंगाबाद नाक्यावर शनिवारी सायंकाळी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील भणगाव येथील सत्यभामा दत्तू माळोदे ही माहिला गावी जाण्यासाठी औरंगाबाद नाक्याजवळ उभी होती़ त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून यामुळेच चोराचे फ ावते असा दम दिला़ तसेच गळ्यातील सोन्याची पोत पिशवीत काढून ठेवण्यास सांगून ती ठेवण्याचा बहाणा करीत लंपास केली़ या प्रकरणी माळोदे यांच्या फि र्यादीवरून अज्ञात दोघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दुसरी घटना उपनगर परिसरात शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, कमल सुभाष चोपडा ही वृद्ध महिला ग्रीन बेल हाऊससमोरून पायी जात असताना मोटारसायकलवर दोन इसम आले़ त्यांनी पुढे खून झाला असून आपण पोलीस असल्याची बतावणी केली़ यानंतर गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले अन्यथा पाच हजार रुपये दंड करण्याची धमकीही दिली़ यामुळे घाबरलेल्या चोपडा यांनी काढलेले दागिने पिशवीत ठेवण्याचा बहाणा करीत या भामट्यांनी लंपास केले़ या प्रकरणी चोपडा यांनी दिलेल्या फि र्यादीवरून उपगनर पोलीस ठाण्यत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)