शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मित्रच मैत्रिणीवर अत्याचार करायला लागले तर काय करायचं? कोलकाता प्रकरणावर तृणमूल खासदाराचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:14 IST

कॉलेजमध्ये पोलिस तैनात करता येणार नाहीत असेही तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले

Kolkata Gangrape Case: कोलकाता येथील लॉ कॉलेज परिसरात एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयातील तीन आजी-माजी विद्यार्थ्यांना अटक केली आहे. मनोजित मिश्रा, जैब अहमद व प्रमित मुखोपाध्याय उर्फ प्रमित मुखर्जी अशी त्यांची नावे आहेत. पीडित विद्यार्थिनी महाविद्यालयात गेल्यानंतर बुधवारी रात्री आरोपींनी एका खोलीत नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर राजकारणही तापलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

कोलकात्याच्या लॉ कॉलेजमध्ये सामूहिक बलात्कार पीडितेच्या वैद्यकीय अहवालात बलात्काराची पुष्टी झाली आहे. कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (सीएनएमसी) येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी आतापर्यंत अनेक मोठे खुलासे केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकाने यापूर्वी पीडितेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. पीडितेने नाकारल्यानंतर आरोपीने त्याच्या मित्रांसह हे कृत्य केले. 

पोलिसांच्या तपासादरम्यान, या प्रकरणाबाबत राजकीय वातावरणही तापू लागले आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या घटनेबाबत एक विचित्र विधान केले आहे. जर एखादा मित्रच बलात्कार करायला लागला तर काय करायचं असा सवाल बॅनर्जी यांनी केला. "लॉ कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेच्या मी बाजूने नाही पण आरोपींना अटक झाली पाहिजे. काही लोक असे गुन्हे करतात पण जर एखाद्या मित्राने त्याच्या मैत्रिणीवर बलात्कार केला तर काय करु शकतो? शाळांमध्ये पोलीस असतील का? विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्यार्थिनीसोबत असे केले. तिचे (पीडित) संरक्षण कोण करेल? हे एक सरकारी कॉलेज आहे. पोलीस नेहमीच तिथे असतील का?" असं कल्याण बॅनर्जी म्हणाले.

"महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये पोलिस तैनात करणे शक्य नाही. पुरुष सहकाऱ्यांचे कर्तव्य आहे की ते त्यांच्या महिला सहकाऱ्यांचे रक्षण करतील. जे लोक फिरत आहेत त्यांनी देखील विचार करावा की ते कोणासोबत फिरत आहेत. काही विकृत मानसिकतेचे लोक असे गुन्हे करतात. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. महिलांनी अशा लोकांविरुद्ध लढले पाहिजे, जरी ते सरकारी महाविद्यालय असले तरी. महाविद्यालय प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे," असंही कल्याण बॅनर्जी म्हणाले.

कल्याण बॅनर्जींचे स्पष्टीकरण

दरम्यान, बलात्कार प्रकरणावर कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. "काही माध्यम संस्थांनी माझ्या विधानाचा वेगळा अर्थ काढला. मी कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचे समर्थन करत नाहीत आणि सर्व आरोपींना अटक करण्याच्या बाजूने आहे," असंही कल्याण बॅनर्जी म्हणाले. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिका