आर्थर रोड जेलमध्ये पोलिसावर हल्ला
By admin | Updated: August 29, 2015 00:20 IST
आर्थर रोड जेलमध्ये पोलिसावर हल्ला
आर्थर रोड जेलमध्ये पोलिसावर हल्ला
आर्थर रोड जेलमध्ये पोलिसावर हल्लामुंबई : हत्येच्या गुन्ात आरोपी असलेल्या तरुणाने कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार चंद्रकांत पाठोरे यांच्यावर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास आर्थर रोड जेलमध्ये घडली. याप्रकरणी राहुल मंत्री या आरोपीविरोधात एन.एम.जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरार पोलीस ठाण्यात मंत्रीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल असून आर्थर रोडच्या कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत आहे. दुपारी रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करून त्याला पुन्हा आर्थर रोड कारागृहात आणण्यात आले. दरम्यान पाठोरे त्याची अंगझडती घेत असल्याच्या रागातून त्याने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगीतले. घटनेत पाठोरे किरकोळ जखमी झाले आहेत.