शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

पोलिसही साधूंच्या वेशात

By admin | Updated: July 11, 2015 00:32 IST

सिंहस्थ कुंभमेळा : कोणी तपोवनात तर कोणी रामकुंडावर फिरणार

सिंहस्थ कुंभमेळा : कोणी तपोवनात तर कोणी रामकुंडावर फिरणारपंचवटी : दि. १० (संदीप झिरवाळ) सिंहस्थ कुंभमेळयातील बारिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तसेच गोपनीय माहीती ठेवण्यासाठी नाशिक पोलीसही साधूमहंतांच्या वेशात दिसु लागले आहेत. डोक्याचे केस तसेच दाढी वाढलेले पोलीस कर्मचारी सिंहस्थ कुंभमेळयात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. विशेष म्हणजे शहरातील काही पोलीस ठाण्यात काम करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना साधूमहंतांचा पेहराव करून सिंहस्थ कुंभमेळयातील गोपनीय माहीतीसाठी नेमणूक करण्यात आल्याचे समजते. सध्या चार पोलीस कर्मचारी साध्या वेशात कार्यरत असुन कोणी अमूक आखाडयाच्या साधू महंतांचे भक्त तर कोणी स्वत: साधू महंत म्हणून आगामी कालावधीत फिरणार आहे. तपोवन साधूग्राम तसेच रामकुंड परिसरात सुरू असलेल्या बारिक हालचालींवर लक्ष केंद्रीत करण्याची जबाबदारी या पोलीस कर्मचार्‍यांवर देण्यात आलेली आहे. सिंहस्थातील प्रमुख पर्वण्यांच्या कालावधीत तसेच गर्दीच्यावेळी हे पोलीस कर्मचारी हातात कमंडलू घेऊन तर कोणी साधूमहंतांप्रमाणेच अंगात भगवे वस्त्र परिधान करून गळयात व हातात तुळशीच्या माळा चढविणार आहेत. साधूमहंतांच्या वेशात असलेले हे पोलीस कर्मचारी साधूग्राममधील आखाडयांत सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळयात काही भोंदू साधू येण्याची शक्यता तर आहेच शिवाय काही गुन्हेगार देखिल साधूमहंतांच्या वेशात तपोवन साधूग्राममध्ये फिरण्याची शक्यता असल्याने त्यांना ओळखण्यासाठी तसेच भाविकांची सिंहस्थ कालावधीत होणारी फसवणूक थांबविण्यासाठी साधूंच्या वेशातील पोलीस कार्यरत राहणार आहेत. गेल्या सिंहस्थ कुंभमेळयातही सिंहस्थातील हालचालींवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी पोलीस साधूमहंतांच्या वेशात कार्यरत होते. यावेळी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळयासाठी पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेतील तसेच पोलीस ठाण्यातील दहाहून अधिक कर्मचारी साधूमहंतांच्या वेशात फिरून तपोवन तसेच रामकुंडावरील घडणार्‍या घटनांची गोपनीय माहीती ठेवणार आहेत. (वार्ताहर)