शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
2
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
3
'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
4
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
5
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
6
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
7
कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
8
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
9
PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
11
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
12
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
13
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
14
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
15
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
16
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
17
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
18
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
19
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
20
अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
Daily Top 2Weekly Top 5

'गब्बर को किस बात की मिली सजा'; पोलिसांच्या भन्नाट ट्वीटची चर्चा

By जयदीप दाभोळकर | Updated: January 21, 2021 09:41 IST

वाचा का केलंय पोलिसांनी ते भन्नाट ट्वीट

ठळक मुद्देपोलिसांच्या त्या ट्वीटला मिळाले हजारो लाईक्स

सध्या देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. याव्यतिरिक्त देशात आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणालाही सुरूवात झाली आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासनही लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत अशातच उत्तर प्रदेशपोलिसांनी कोरोनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला एक क्लासिक चित्रपट शोलेमधील एका दृश्याची मदत घेतली आहे. 'गब्बर को किस बात की मिली सजा' असं कॅप्शन देत पोलिसांनी एक क्लिप शेअर केली आहे. यामध्ये अमजद खान यांनी साकारलेलं गब्बर हे पात्र उघड्यात थुंकताना दाखवलं आहे. तर या चित्रपटातील ठाकूर यांची भूमिका साकारणारे संजीव कुमार हे त्याला गळा दाबून पकडताना दाखवण्यात आलं आहे. व्हिडीओच्या अखेरिस एक संदेशही लिहिण्यात आला आहे. 'सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कोविड १९ चा प्रसार वाढू शकतो. हा एक गुन्हा आहे.' सार्वजनिक ठिकाणी  थुंकू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचं हे भन्नाट ट्वीट अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे. अनेकांनी त्यांच्या क्रिएटिव्हीटीची वाहवा केली आहे. त्यांना या ट्वीटला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि हजारो रिट्वीट्सही मिळाले आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस