शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

POK पाकिस्तानचा भाग, काश्मीरप्रश्नी पाकिस्तानशी चर्चा करा -फारुख अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 17:13 IST

केंद्र सरकारला काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर त्यांना पाकिस्तान बरोबर चर्चा करावीच लागेल असे फारुख अब्दुल्ला म्हणाले. 

ठळक मुद्देभारत सरकारने पाकिस्तानबरोबर चर्चा केली पाहिजे कारण काश्मीरचा काही भाग त्यांच्या ताब्यात आहे.

श्रीनगर - पीओके म्हणजे पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे. जम्मू-काश्मीर ज्याप्रमाणे भारताचा भाग आहे तसेच पीओकेवर पाकिस्तानचा अधिकार आहे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काश्मीरचा मुद्दा सोडवायचा असल्यास आपल्याला पाकिस्तान बरोबर चर्चा करावी लागेल. केंद्र सरकारला काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर त्यांना पाकिस्तान बरोबर चर्चा करावीच लागेल असे फारुख अब्दुल्ला म्हणाले. 

जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने दिनेश्वर शर्मा यांची निवड केली आहे. त्यांच्याबद्दल तुमचे मत काय ? या प्रश्न फारुख अब्दुल्ला म्हणाले कि, मी यावर जास्त बोलू शकत नाही. त्यांनी काही जणांबरोबर चर्चा केली आहे पण फक्त चर्चेने तोडगा निघणार नाही. काश्मीरचा मुद्दा हा भारत-पाकिस्तानमध्ये आहे. भारत सरकारने पाकिस्तानबरोबर चर्चा केली पाहिजे कारण काश्मीरचा काही भाग त्यांच्या ताब्यात आहे. फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेकदा अशा प्रकारची विधानं केली आहेत. 

सर्व सैन्य लावले तरी दहशतवाद पुरून उरेल दोन वर्षांपूर्वी फारुख अब्दुल्ला म्हणाले होते कि, पाकिस्तानने व्यापलेले काश्मीर त्यांच्याकडेच राहणार आहे व भारताकडील काश्मीर आपल्याकडे राहणार आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि जम्मू-काश्मीर कधीच एक होऊ शकणार नाहीत, हे मी राजकारणात आल्यापासून सांगत आलो आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर परत मिळविण्याची ताकद आपल्यात नाही व आपले काश्मीर घेण्याचे बळ पाकिस्तानात नाही. आपल्याप्रमाणे तोही (पाकिस्तान) एक अण्वस्त्रधारी देश आहे. लष्कर तरी आपले किती संरक्षण करू शकेल. सर्व सैन्य जरी मदतीला आले तर ते दहशतवादी आणि बंडखोरांपासून आपला बचाव करू शकणार नाहीत. त्यामुळे (पाकिस्तानशी) चर्चा करून मार्ग काढणे हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो, यावर त्यांनी भर दिला.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्ला