शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 10:29 IST

दर महिन्याला 150 कोटी रुपयांची वसुली करण्याचं लक्ष्य

नवी दिल्ली: नीरव मोदीनं तब्बल 13 हजार कोटी बुडवल्यानं संकटात सापडलेल्या पंजाब नॅशनल बँकेनं आता कर्जवसुलीसाठी कंबर कसली आहे. पीएनबीनं कर्ज बुडवणाऱ्यांच्या विरोधात अनोखं अभियान सुरू केलं. या अभियानांतर्गत बँकेचे कर्मचारी गांधीगिरीच्या मार्गानं कर्जवसुली करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या पीएनबीचे कर्मचारी कर्जाची परतफेड न करणाऱ्यांच्या कार्यालयात फलक घेऊन बसतात. यामुळे पैसे बुडवणाऱ्यांना स्वत:ची लाज वाटेल आणि ते कर्जाची परतफेड करतील, अशी आशा पीएनबीला आहे. या माध्यमातून महिन्याकाठी 150 कोटी रुपयांच्या कर्जवसुलीचं लक्ष्य बँकेनं ठेवलं आहे. 'पीएनबी'चं मिशन गांधीगिरी अभियान एक वर्ष चालणार आहे. हिरे व्यापारी नीरव मोदीनं 13 हजार कोटींचं कर्ज बुडवल्यानं पीएनबीवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यामुळेच आता बँकेनं कर्जवसुलीसाठी गांधीगिरी सुरू केली आहे. या अभियानांतर्गत बँक कर्मचाऱ्यांची टीम पैसे बुडवणाऱ्या व्यक्तीच्या घरी किंवा कार्यालयात जाऊन बसते. या टीमकडून कोणतीही घोषणाबाजी केली जात नाही. सध्या या गांधीगिरी अभियानात बँकेच्या 1,144 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. कर्जदारांशी चर्चा सुरू व्हावी, त्यातून दर महिन्याला 100 ते 150 कोटी रुपयांचं कर्ज वसूल व्हावं, यासाठी गांधीगिरी अभियान सुरू केल्याची माहिती बँकेनं प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. बँकेनं हेतुपुरस्पर कर्ज बुडवणाऱ्यांची यादी तयार केली असून त्यात 1,084 लोकांच्या नावांचा समावेश आहे. यातील 220 जणांचे फोटो बँकेनं वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले आहेत. कर्जाची परतफेड न करणाऱ्या 150 जणांचे पासपोर्ट गेल्या काही महिन्यांमध्ये जप्त करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा