शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

PNB Scam: नीरव मोदीविरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 10:55 AM

पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण समोर आल्यानंतर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसीविरोधात विविध तपास यंत्रणा चौकशी करत आहेत.

नवी दिल्ली- हजारो कोटींचा पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करून देशाबाहेर परागंदा झालेल्या नीरव मोदीविरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण समोर आल्यानंतर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसीविरोधात विविध तपास यंत्रणा चौकशी करत आहेत.तत्पूर्वी नीरव मोदीविरोधात विशेष न्यायालयानं अंमलबजावणी संचलनालयानं प्रत्यार्पणाची कारवाई सुरू करण्यास परवानगी दिली होती. ईडीनं सोमवारी प्रत्यार्पणासंबंधी अर्जही दिला होता. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसीविरोधात अनेक सरकारी यंत्रणा तपास करत आहेत. दोन्ही परदेशात पळाल्यानंतर सीबीआय आणि ईडीनं त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल केलं होतं. नीरव मोदीविरोधात हवाला प्रकरणात सुनावणी करत असलेल्या विशेष न्यायालयानं ईडीला कारवाईची परवानगी दिली आहे.ईडीचे वकील हितेन वेंगावकर या प्रकरणातील आदेशाला परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवणार आहे. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय तोच आदेश ब्रिटिश सरकारला पाठवेल. सूत्रांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणांनी इतर देशांनाही नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासंबंधी अर्ज पाठवले आहेत. नीरव मोदी वारंवार वास्तव्याची ठिकाणं बदलत असतो. नीरव मोदीविरोधात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये आधारे न्यायालयानं त्याला अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे. 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकfraudधोकेबाजी