शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

PNB Scam : ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांची सीबीआयकडून चौकशी, अॅक्सिस बँकेलाही नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 15:09 IST

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 12,636 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी चौकशीसाठी बोलावलं आहे

मुंबई - पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 12,636 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. चंदा कोचर यांच्यासहित अॅक्सिस बँकेच्या सीईओ शिखा शर्मा यांनाही नोटीस पाठवण्यात आलं आहे. गितांजली ग्रुपला कर्ज वितरित केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदा कोचर सध्या सीबीआय कार्यालयात उपस्थित आहेत. 6 मार्चला त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं होतं. दरम्यान सीबीआयने मंगळवारी घोटाळ्याशी संबंधित तपासासाठी गितांजली ग्रुपचे बँकिंग व्यवहार सांभाळणारे उपाध्यक्ष विपुल चितालिया यांचीही चौकशी केली. विपुल चितालिया बँकाँकवरुन परतले असता सीबीआयने मुंबई विमानतळावरुनच त्यांना चौकशीसाठी नेलं. 

हिरा व्यापारी नीरव मोदीसोबत मेहुल चोकसीवर 12,636 कोटींच्या पीएनबी घोटाळ्याचा आरोप आहे. याच घोटाळ्यात अतिरिक्त 1300 कोटींचा घोटाळा झाल्याचा खुलासा 26 फेब्रुवारीला झाला होता. सीबीआयने 14 फेब्रुवारीला नीरव मोदी, त्याची पत्नी एमी, भाऊ निशाल मोदी, मेहुल चोकसी आणि त्यांच्या कंपन्या डायमंड आर यूएस, सोलर एक्सपोर्ट्स आणि स्टेलार डायमंडविरोधात पहिला एफआयआर दाखल केला होता. निरव मोदी, त्याचं कुटुंब आणि मेहुल चोकसी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देश सोडून फरार झाला होता. सीबीआयने गितांजली ग्रुपविरोधात 4,886.72 कोटींची फसवणूक केल्याचा दुसरा गुन्हा 15 फेब्रुवारीला दाखल केला होता. 

विराट कोहलीचा पंजाब नॅशनल बँकेसोबतच्या कराराचे नुतनीकरण न करण्याचा निर्णय नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) तब्बल 12,600 कोटींचा घोटाळा केल्यानंतर बँकेची प्रतिमा चांगलीच मलीन झाली आहे. या घोटाळ्यानंतर गुंतवणूकदारांच्या ठेवींना कोणताही धोका नाही, असे बँकेकडून आश्वस्त करण्यात आले होते. परंतु, या सगळ्यामुळे बँकेची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने पंजाब नॅशनल बँकेसोबतच्या कराराचे नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट हा बँकेचा सदिच्छादूत आहे. मात्र, नुकत्याच उघड झालेल्या घोटाळ्यामुळे विराटने ही भागीदारी संपविण्याचा निर्णय घेतला आहे. 

विराटच्या क्रिकेट एजन्सीकडून याबद्दलची माहिती देण्यात आली. विराटने यापुढे बँकेसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला असला तरी सध्याच्या कराराची मुदत संपेपर्यंत विराट त्यांच्यासोबत असेल. मात्र, सध्याच्या कराराचे नुतनीकरण केले जाणार नाही. या संपूर्ण घटनाक्रमात बँक म्हणून पीएनबीचा कोणताही दोष नाही, असे आम्हाला वाटते. विराट ठरलेल्या कराराची मुदत पूर्ण करणार आहे. त्यामुळे आम्ही स्वत:हून करार रद्द केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कॉर्नरस्टोन स्पोर्टस अँण्ड एंटरन्टेन्मेंटचे सीईओ बंटी सजदेह यांनी सांगितले. 

यापूर्वी पंजाब नॅशनल बँकेने विराटने सदिच्छादूत (ब्रँड अॅम्बेसिडर) म्हणून असलेला त्यांच्यासोबतचा करार रद्द केल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. थकीत कर्जांमुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्रात चितेंचे वातावरण असताना स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी 'पीएनबी'ने विराटला करारबद्ध केले होते. 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकNirav Modiनीरव मोदी