शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

PNB Scam : मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला अटक, ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 10:12 IST

PNB Scam : पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील एक आरोपी मेहुल चोकसीच्या एका सहकाऱ्याला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली -  पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील एक आरोपी मेहुल चोकसीच्या एका सहकाऱ्याला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे. दीपक कुलकर्णी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ईडी आणि सीबीआयनं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगहून परत आलेल्या दीपक कुलकर्णीला कोलाकाता विमानतळावर अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. 

(नीरव मोदीकडून नऊ याचिका दाखल)

दरम्यान, पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याने विशेष पीएमएलए न्यायालयात वेगवेगळ्या नऊ याचिका दाखल केल्या. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपासाला सहकार्य करत नसल्याच्या आरोपांसह अन्य आरोप मोदीने फेटाळले आहेत, तसेच या सर्व केसेस विशेष सीबीआय न्यायालयात वर्ग कराव्यात, अशी मागणी मोदीने केली आहे.आपण फरार नाही, तसेच आपण तपासासाठी सहकार्य करत नाही, हा ईडीने केलेला दावा खोटा आहे, असे मोदी याने त्याच्या याचिकांत म्हटले आहे. न्यायालयाने सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना आर्थिक फरारी गुन्हेगार म्हणून जाहीर करण्यात यावे व त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी, यासाठी ईडीने काही दिवसांपूर्वी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जावर मोदीने उत्तर दिले आहे.

 

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार आरोपी नीरव मोदी याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हाँगकाँगमध्ये कारवाई करून २५५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.पीएनबीमधील घोटाळ्यात नीरव मोदीसोबत त्याचा मामा मेहुल चोक्सीही सहभागी होता. या दोघांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत त्यांची सुमारे ४,७४४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. नीरव मोदी याच्याविरुद्ध एक फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने काही मौल्यवान वस्तू २६ जहाजांमध्ये भरून हाँगकाँगला पाठविल्या. दुबईमधील त्याच्याच एका कंपनीने ही वाहतूक केली होती. हा ऐवज आता ईडीने जप्त केला आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रीच कँडी शाखेत तब्बल १२ हजार ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले. अ‍ॅक्सिस आणि अलाहबाद बँकेच्या परदेशी शाखांचाही या घोटाळ्यात फसगत झाल्याचे निदर्शनास आले. हा घोटाळ्याचा कट नीरव मोदी, मेहुल चोक्सी व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी रचल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मोदी व चोक्सी यांना अटक करण्यापूर्वीच त्यांनी देशाबाहेर पळ काढला.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNirav Modiनीरव मोदी