शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

PNB Scam: पगार देऊ शकत नाही, दुसरी नोकरी शोधा, नीरव मोदीची कर्मचा-यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 17:48 IST

पंजाब नॅशनल बँकेमध्ये 11 हजार 400 कोटींचा घोटाळा करून परागंदा झालेला हिरा व्यापारी नीरव मोदी हा आता पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहे.

नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार 400 कोटींचा घोटाळा करून परागंदा झालेला हिरा व्यापारी नीरव मोदी हा आता पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहे. बँकांना पैसे देण्यास नकार देणा-या नीरव मोदीनं आता स्वतःच्या मालकीच्या कंपन्यांमधील कर्मचा-यांना दुसरी नोकरी शोधण्याची सूचना केली आहे. नीरव मोदीनं मंगळवारी कंपनीच्या नावे एक ईमेल पाठवला. कर्मचा-यांनी कामावर येऊ नये, कारण कंपनी कर्मचा-यांना पगार देण्याच्या स्थितीत नाही. तसेच भविष्याचा विचार करता कर्मचा-यांनी बाहेर नोकरी शोधणं सुरू केलं पाहिजे, असंही नीरव मोदीनं ईमेलमधून सांगितलं आहे. नीरव मोदीनं असा ईमेल पाठवल्याची माहिती कंपनीच्या एका कर्मचा-यानं दिली आहे.पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर सीबीआय आणि ईडीने नीरव मोदी याच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकून तब्बल 5 हजार 100 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. तसेच नीरव मोदीची भारतातील बँक खाती सील करण्यात आली आहेत. दुसरीकडे नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी भारतात परत यावे आणि तपास यंत्रणांना सामोरे जावे, यासाठी दोघांचे पासपोर्ट शुक्रवारी निलंबित करण्यात आले. मोदी व चोकसीच्या शोधासाठी सीबीआयने इंटरपोलशी संपर्क साधला आहे. त्याच्याविरोधात ‘डिफ्यूजन नोटीस’ जारी करण्याची विनंती इंटरपोलला केली आहे. गेली कित्येक वर्षे आपण बँकांशी व्यवहार केले आहेत. रक्कम वेळेवर चुकती न केल्याची तक्रार करण्याची वेळ कधीही तुमच्यावर आली नाही. माझ्या खात्यांमधील व्यवहारांमुळे बँकेला विविध प्रकारच्या शुल्कापोटी कित्येक कोटी रुपये मिळाले. तेव्हा बँकेने न्यायाने वागावे आणि माझ्या कंपन्यांच्या करंट खात्यांमध्ये असलेल्या रकमेतून निदान माझ्या 2200 कर्मचा-यांचे पगार तरी मला देऊ द्यावेत, अशी विनंती मोदीने काही दिवसांपूर्वी केली होती. आपल्या ज्या कंपन्यांविरुद्ध बँका व तपास यंत्रणांनी कारवाई सुरू केली आहे. त्यात संबंध नसलेल्या नातेवाइकांना निष्कारण गोवल्याचा दावाही मोदीने केला होता. त्यानं लिहिलं होतं की, हे प्रकरण ज्या व्यवहारांशी संबंधित आहे, त्याच्याशी माझ्या भावाचा व पत्नीचा संबंध नसूनही त्यांचा संशयित आरोपी म्हणून नामोल्लेख केला गेला. माझ्या मामाचाही स्वतंत्र व्यवसाय आहे व त्याचा याच्याशी काही संबंध नाही. मी बँकेशी केलेल्या व्यवहारांची या तिघांना अजिबात कल्पना नाही, असंही मोदी म्हणाला होता. 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदी