शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

PNB Recruitment 2021: पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी, परीक्षाही नाही; 12 वी पास करू शकणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 18:26 IST

PNB Recruitment for peons Post: महत्वाचे म्हणजे यासाठी उच्चशिक्षण किंवा कोणत्याही विशेष शाखेतून शिक्षण घेतल्याची अट नसून परीक्षाही घेतली जाणार नाहीय. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या मोठ्या बँकेने म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) यावेळी विशेष भरती आयोजित केली आहे.

बँकेमध्ये नोकरी करु इच्छिनाऱ्या तरुण बेरोजगारांसाठी किंवा नोकरी शोधत असलेल्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी उच्चशिक्षण किंवा कोणत्याही विशेष शाखेतून शिक्षण घेतल्याची अट नसून परीक्षाही घेतली जाणार नाहीय. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या मोठ्या बँकेने म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) यावेळी विशेष भरती आयोजित केली आहे. यामुळे देशभरातून कुठूनही तुम्ही अर्ज करू शकणार आहात व तुमच्या भागात नोकरी करू शकणार आहात. (Punjab National Bank Recruitment 2021: Huge Opportunity For 12th Passed Students, Apply Soon)

पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) देशभरातील शाखांसाठी शिपायी पदासाठी 152 जागांवर भरती सुरु केली आहे. यासाठी बँकेने भरतीची जाहिरात काढून अर्ज मागविले आहेत. या भरतीसाठी फक्त 12 वी पास असण्याची आवश्यकता आहे. यासोबत हिंदी आणि इंग्रजीचे सामान्य ज्ञान असावे. अशा योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी आपल्या आपल्या विभागानुसार ठरविलेल्या तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे. 

पीएनबीने अधिकृत वेबसाईटवर pnbindia.in वर भरतीची जाहिरात आणि माहिती प्रसिद्ध केली आहे. देशभरात भरती असल्याने तुम्हाला कोणतेही बंधन असणार नाही. 

नोटीस : 11 फेब्रुवारी, 2021चेन्नई सर्कल : 22 फेब्रुवारी, 2021हिसार सर्कल : 26 फेब्रुवारी, 2021 बंगळुरू वेस्ट सर्कल : 27 फेब्रुवारी, 2021सूरत सर्कल : 01 मार्च, 2021बंगळुरू  ईस्ट सर्कल :  01 मार्च, 2021बालासोर सर्कल : 01 मार्च, 2021रोहतक सर्कल : 03 मार्च, 2021हरियाणा सर्कल : 04 मार्च, 2021

रिक्त पदेहिसार सर्किल : 19रोहतक सर्कल : 22चेन्नई साउथ सर्कल : 20बालासोर सर्कल : 19बंगळुरू वेस्ट सर्कल : 18बंगळुरू ईस्ट सर्कल : 25सूरत सर्कल : 10हरियाणा सर्कल  : 19

वयाची अट कमीतकमी वय 18 वर्षे ते जास्तीतजास्त वय 24 वर्षे असावे. या जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यानुसार तुमच्या क्षेत्रातील बँकेमध्ये जाऊन अर्जासोबत स्व-हस्ताक्षरित फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्र, योग्यता प्रमाण-पत्र आदी जमा करायचे आहे. 

भरती नोटिफिकेशन जारी करण्यासाठी इथे क्लिक करा...ऑफलाईन अर्जासाठी इथे क्लिक करा...

Railways Recruitment 2021: मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूरमध्ये जवळपास 2500 जागांवर भरती निघाली होती. याला आता दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) आणि वेस्ट सेंट्रल रेल्वे (West Central Railway) ने देखील हातभार लावला आहे. आता एकूण ट्रेड अप्रेंटिसच्या 3119 झाल्या आहेत. यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Railways Recruitment 2021 for 3119 Apprentice Posts: Apply Online @rrccr.com, Download RRC Railway Notification Here)

नोकर भरतीच्या अन्य बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

 

टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकgovernment jobs updateसरकारी नोकरीjobनोकरी