शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नशीब! PNB च्या शिपायाला अटक केली नाहीत; शत्रुघ्न सिन्हांचा सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 15:46 IST

'ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को', असे विधान केले होते. हाच न्याय लावायचा झाल्यास तुमच्याकडे घोटाळ्यासंदर्भात काही स्पष्टीकरण आहे का, असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला. 

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेतील 11 हजार कोटींच्या घोटाळ्याचे खापर लेखापरीक्षकांवर (ऑडिटर्स) आणि नियंत्रकांवर फोडणाऱ्या केंद्र सरकारला खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी घरचा आहेर दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघड झाल्यानंतर आपल्याकडील काही सुशिक्षित लोकांनी यासाठी नेहरूंच्या काळापासून काँग्रेसच्या राजवटीतील गैर कारभार कारणीभूत असल्याची टीका करून झाल्यानंतर ऑडिटर्सना दोषी ठरवले. नशीब त्यांनी याप्रकरणी एखाद्या शिपायाला पकडले नाही. शत्रुघ्न सिन्हा यांच्या या विधानाचा रोख केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे होता. जेटली यांनी काही दिवसांपूर्वी या घोटाळ्यासाठी बँकेच्या बहुस्तरीय लेखापरीक्षण व्यवस्थेला जबाबदार धरले होते. मात्र, हे आरोप करण्यापूर्वी सरकारने चार वर्षांमध्ये काय केले, हा मूळ प्रश्न आहे. ही सरकारी मालकीची बँक आहे. त्यामुळे घोटाळा सहा वर्षांच्या कालावधीत घडला हे गृहीत धरले तरी चार वर्ष बँकेचे नियंत्रण सरकारकडे होते. मध्यंतरी जेटलींनी , 'ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को', असे विधान केले होते. हाच न्याय लावायचा झाल्यास तुमच्याकडे घोटाळ्यासंदर्भात काही स्पष्टीकरण आहे का, असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला. 

सध्या पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यावरून काँग्रेस आणि भाजपा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. हा घोटाळा मोदींच्या सरकारमध्येच झाला असा आरोप कॉंग्रेस करत असताना भाजपाने मात्र घोटाळ्याची सुरूवात काँग्रेस सरकारच्या काळात झाल्याचा आरोप केला आहे. पण सत्य हे आहे की वेळीच सरकार जागं झालं असतं तर हा घोटाळा रोखता आला असता. कारण, या घोटाळ्याची कुणकुण लागताच तपास यंत्रणांपासून ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत याबाबत तक्रार केली होती असा दावा दिनेश दुबे यांनी केला होता. अलाहाबाद बॅंकेचे माजी डायरेक्टर दिनेश दुबे यांच्यानुसार, त्यांनी 2013 मध्ये युपीए सरकारच्या काळात मेहुल चौकसीच्या गीतांजली कंपनीला कर्ज देण्याचा विरोध केला होता. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. सध्या दिनेश दुबे यांची ओळख व्हिसल ब्लोअर (घोटाळा उघडकीस आणणारा) म्हणून होत आहे. त्यांच्या सूचनेवर वेळीच कारवाई केली असती तर पंजाब नॅशनल बॅंकेचा महाघोटाळा टाळता आला असता असं मानलं जात आहे. 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNirav Modiनीरव मोदीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाArun Jaitleyअरूण जेटली