शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल यांना झटका; कोर्टाने 28 मार्चपर्यंत पाठवले ED रिमांडवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 21:42 IST

अरविंद केजरीवाल यांना आता 28 मार्च रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल.

Arvind Kejriwal Arrested: दिल्लीतील मद्य घोटाळ्यातील कथित मनी लाँड्रिग प्रकणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मोठा धक्का बसला आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच, त्यांना 6 दिवसांच्या ED कोठडीत पाठवले आहे. केजरीवाल यांना आता 28 मार्च रोजी न्यायालयात हजर केले जाईल. 

या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार केजरीवाल आहेत, त्यामुळे त्यांना 10 दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीने केली होती. मात्र न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची कोठडी सुनावली. आता त्यांना 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता न्यायालयात हजर कले जाईल.

दरम्यान, राऊस एव्हेन्यू कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीच्या वतीने सहाय्यक सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत. केजरीवाल यांनी इतर नेत्यांसोबत मिळून हा कट रचला. दिल्लीत नवीन मद्य धोरण लागू करण्यात केजरीवाल यांचा थेट सहभाग होता. या संपूर्ण प्रकरणात पीएमएलए अंतर्गत अनेक आरोप आहेत.

केजरीवालांचे वकील काय म्हणाले?

तर, वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केजरीवालांची बाजू मांडली. त्यांनी म्हटले की, निवडणुकीत सहभाग घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ईडी रिमांड पेपरवर इतकी घाई का करत आहे? ईडीकडे अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कुठलाही थेट पुरावा नाही. तपासात सहभागी 50 टक्के लोकांनी केजरीवालांचे नाव घेतले नाही. तर 80 टक्के लोकांनी केजरीवालांसोबत कुठलीही डीलिंग झाल्याचा उल्लेख केला नाही. काहीही न सांगता अटक करू शकत नाही. अरविंद केजरीवाल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. 

ईडीचा केजरीवालांवर आरोपईडीने आपल्या रिमांड नोटमध्ये आप पक्षाचे वर्णन कंपनी असे केले आहे. ईडीच्या रिमांड नोटमध्ये केजरीवाल हे मास्टरमाईंड असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अबकारी धोरण बनवण्यात केजरीवाल यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे ईडीचे म्हणने आहे. तसेच, लाच म्हणून मिळालेला पैसा गोवा निवडणुकीत गुंतवण्यात आला. विजय नायर आणि मनीष सिसोदिया यांच्या सहकार्याने साऊथ लॉबीकडून पैसे घेण्यात आल्याचा दावाही ईडीने केला आहे. 

'आप' पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय म्हणाले की, 26 मार्च रोजी आम आदमी पार्टी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहे. उद्या दिल्लीतील शाहिदी पार्क येथे आपचे दिल्लीतील सर्व आमदार, नगरसेवक आणि इंडिया आघाडीचे विविध नेते हुकूमशाहीविरोधात एकत्र येतील. देश वाचवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपCourtन्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय