शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात मोफतचं रेशन धान्य बंद, केवळ उत्तर प्रदेशात 4 मार्चपर्यंत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 16:29 IST

अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली. पंतप्रधान गरिब कल्याण योजनेंतर्गत देशातील जनतेला नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य देण्यात आले आहे.

ठळक मुद्देअयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली

लखनौ - पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने (PMGKY) अंतर्गत गरीबांना नोव्हेंबरनंतर मोफत रेशन मिळणे कठीण आहे. अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी सांगितले की, सध्या नोव्हेंबरनंतरही या योजनेअंतर्गत गरिबांना रेशन देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र, मोदी सरकारची ही योजना आता बंद होत असली तरी योगी सरकार ही योजना आणखी 4 महिने सुरूच ठेवणार आहे. अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली. पंतप्रधान गरिब कल्याण योजनेंतर्गत देशातील जनतेला नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य देण्यात आले आहे. केंद्र सरकारने ही योजना आता बंद केली आहे. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी मार्च महिन्यापर्यंत ही योजना सुरूच ठेवण्याचा निर्णय उत्तर प्रदेशमध्ये घेतला आहे. त्यामुळे, पुढील 4 महिने येथील सर्वसामान्य जनतेला मोफत रेशनचं धान्य मिळणार आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये डाळ, तेल आणि मीठ हेही वाढीव मिळणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळापासून गरीब कुटुंबांना केंद्र सरकारकडून मोफत रेशन दिले जात आहे. यावर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना मार्च 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना एप्रिल ते जून 2020 पर्यंत होती. त्यानंतर ते नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली. मात्र, आता ही योजना गुंडाळण्यात येत आहे. अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी सांगितले की, अर्थव्यवस्था आता सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्याची कोणतीही योजना नाही. त्यामुळे, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात ही योजना सुरूच राहणार असल्याची घोषणा केली. 

पीएल. पुनिया यांनी लगावला टोला

योगी सरकारच्या या निर्णयानंतर छत्तीसगडमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार पी एल. पुनिया यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊनच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटलंय. तसेच, उत्तर प्रदेशात अद्यापही 15 कोटी जनता गरीबच आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, युपीमध्ये 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे, योगी सरकारने दोन दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर, आता मोफत रेशनचं धान्य देण्याचाही निर्णय घेतला आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूक