कोलकाता- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या ठाकूरनगर रॅलीमध्ये ते म्हणाले, पश्चिम बंगालच्या जनतेचा एवढा पाठिंबा असल्याचं चित्र पाहिल्यामुळेच ममतादीदी हिंसेवर उतरल्या होत्या हे मला आता समजलं. आमच्याप्रति पश्चिम बंगालच्या जनतेत असलेल्या प्रेमाला घाबरून लोकशाहीच्या वाचवण्याचं नाटक करणारे निर्दोषांचा बळी घेण्याच्या मागे आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत गावाकडच्या परिस्थितीकडे लक्ष देण्यात आलेलं नाही, हे देशाचं दुर्भाग्य आहे. पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत गावांमधील समस्या बिकट असल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
...म्हणून 'दीदी' हिंसेवर उतरल्या तर; नरेंद्र मोदींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 14:02 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
...म्हणून 'दीदी' हिंसेवर उतरल्या तर; नरेंद्र मोदींचा टोला
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या जनतेचा एवढा पाठिंबा असल्याचं चित्र पाहिल्यामुळेच ममतादीदी हिंसेवर उतरल्या होत्या हे मला आता समजलं.