शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Verdict: निर्णयाकडे जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 13:34 IST

ऐतिहासिक निकालानंतर देशातील जनतेला मोदींचं आवाहन

मुंबई: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. अयोध्या प्रकरणात आलेल्या 'सर्वोच्च' निकालाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केलं आहे. या निर्णयाकडे कोणीही जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नये, असं आवाहन मोदींनी केलं आहे.  रामभक्ती असो वा रहिमभक्ती, ही वेळ भारतभक्तीला सशक्त करण्याची आहे. देशातील जनतेनं शांतता, सलोखा आणि एकता टिकवून ठेवावी, असं आवाहन मोदींनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे. 'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही वादातून तोडगा काढण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे, हे अयोध्या प्रकरणाकडे पाहिल्यावर समजतं. या खटल्यात प्रत्येक पक्षकाराला त्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला. न्यायमंदिरानं कित्येक दशकं जुन्या असलेल्या प्रकरणातून सौहार्दपूर्ण मार्ग काढला,' असंदेखील मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.   

अयोध्या प्रकरणात न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचा न्याय प्रक्रियेवरील विश्वास आणखी वाढेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता 130 कोटी भारतीयांना हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या बंधुत्वाच्या भावनेतून शांतता आणि संयमाचा परिचय द्यायचा आहे, असंदेखील मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय