शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 08:49 IST

शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम बांगलादेशकडून रद्द

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी १७ मार्चला बांगलादेशला जाणार होतेकोरोनामुळे बांगलादेशकडून कार्यक्रम रद्दमोदी प्रमुख वक्ते म्हणून म्हणून सोहळ्यात सहभागी होणार होते

नवी दिल्ली: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे कित्येक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम रद्द झाले आहेत. कोरोनामुळे अनेक परिषदा रद्द करण्याची वेळ आली आहे. जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांच्या दौऱ्यांवरही कोरोनाचा परिणाम पाहायला मिळत आहे. बांगलादेश सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेला शताब्दी सोहळा रद्द केला आहे. मोदी या सोहळ्यात मुख्य वक्ते म्हणून सहभागी होणार होते. बांगलादेश सरकारनं सोहळा रद्द केल्यानं मोदींनी त्यांचा बांगलादेश दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदी १७ मार्चला बांगलादेशला जाणार होते. मात्र कोरोनामुळे त्यांना हा दौरा रद्द करावा लागला आहे. शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेला शताब्दी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती सोहळ्याच्या आयोजन समितीचे अध्यक्ष कमाल अब्दुल चौधरी यांनी दिली. कालच बांगलादेशमधल्या तिघांच्या कोरोनाच्या चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे तिघेही नुकतेच इटलीहून परतले होते. शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित शताब्दी सोहळ्याची नव्यानं आखणी करण्यात येईल, अशी माहिती चौधरींनी दिली. 'हा सोहळा वर्षभर चालेल. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळायची आहे. आम्ही वर्षभर कार्यक्रम करू आणि जगभरातल्या दिग्गज व्यक्ती यात सहभागी होतील,' असं चौधरी म्हणाले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना कोणत्याही सार्वजनिक सभेशिवाय शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित शताब्दी सोहळ्याचं उद्घाटन करणार आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेता या सोहळ्याचं स्वरुप अतिशय मर्यादित ठेवण्यात आलं आहे. शेख हसीना यांनीच मोदींना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. रहमान बांगलादेशाचे संस्थापक असून त्यांना बांगलादेशचे राष्ट्रपिता संबोधलं जातं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBangladeshबांगलादेशcorona virusकोरोना