नवी दिल्ली: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं भारतातही दहशत पसरवलीय. अद्याप कोणालाही कोरोनावरील लस शोधण्यात यश आलेलं नाही. कोरोनावरील लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना कोरोनाला पायबंद घालण्यासाठी उपाय सुचवण्याचं आवाहन केलंय. कोरोनाला रोखण्यासाठी उपाय सुचवा आणि १ लाख जिंका, असं मोदींनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. अवघ्या तासाभरापूर्वी पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटला आतापर्यंत शेकडो रिट्विट्स आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. मोदी सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनीदेखील पंतप्रधानांचं ट्विट रिट्विट केलंय. आपल्या पृथ्वीवरील वातावरण आरोग्यदायी करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय सुचवा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक जण तंत्रज्ञानावर आधारित उपाय सुचवत आहेत. त्यांनी हे उपाय @mygovindia वर सुचवावेत, असं आवाहन मी त्यांना करतो. अशा प्रयत्नांचा फायदा अनेकांना होईल, असं मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय. कोरोनाला आळा घालण्याचे उपाय सुचवण्यासाठी सरकारनं 'कोविड १९ सोल्युशन चॅलेंज'चं आयोजन केलंय. मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये माय गव्हर्नमेंट पेजची लिंकदेखील दिली आहे.
Coronavirus: कोरोना रोखण्याचे उपाय सुचवा अन् १ लाख जिंका; पंतप्रधान मोदींचं देशवासीयांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 21:12 IST
कोरोनाला रोखण्यासाठी पर्याय सुचवा; मोदींचं आवाहन
Coronavirus: कोरोना रोखण्याचे उपाय सुचवा अन् १ लाख जिंका; पंतप्रधान मोदींचं देशवासीयांना आवाहन
ठळक मुद्देकोरोनाला आळा घालण्याचे उपाय सुचवण्याचं आवाहनसर्वोत्कृष्ट उपाय सुचवणाऱ्यांचा सरकारकडून गौरव होणारमोदींच्या ट्विटला हजारो लाईक्स; शेकडो रिट्विट्स