शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे PM मोदींच्या हस्ते आज होणार लोकार्पण; काय खास सुविधा मिळणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 08:57 IST

या वॉटर मेट्रो रेल्वे सेवेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती जाणून घेऊया... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमध्ये भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. वॉटर मेट्रोच्या संचालनाची संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी 14 टर्मिनल बनवण्यात आले आहेत. यासाठी 23 वॉटर बोट्स तयार ठेवण्यात आल्या आहेत. शहरी जीवनशैलीत सुधारणा करण्यासाठी मेट्रो सिस्टमच्या वेगवेगळ्या रुपांचा विकास केला जात आहे. वॉटर मेट्रो या  गोष्टीचे उदाहरण आहे. या वॉटर मेट्रो रेल्वे सेवेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती जाणून घेऊया... 

- कोची वॉटर मेट्रो शहराच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. 1,136 कोटी रुपयांचा हा प्रकल्प केरळसाठी एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जात आहे. सार्वजनिक वाहतूक आणि पर्यटनाच्या माध्यमातून शहरातील आर्थिक उपक्रमांना चालना मिळू शकेल.

- कोची आणि जवळपासच्या दहा बेटांदरम्यान वॉटर मेट्रो सुरू होत आहे. कोची वॉटर मेट्रो पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल आणि विट्टीला-कक्कनड टर्मिनल दरम्यान सुरू होईल.

- वॉटर मेट्रोवरील प्रवासाचे किमान भाडे 20 रुपये आहे, जे नियमित प्रवासी आहेत, ते बस किंवा लोकल ट्रेनसारखे साप्ताहिक आणि मासिक पास देखील घेऊ शकतात. दरम्यान, साप्ताहिक भाडे 180 रुपये असेल, तर मासिक भाडे 600 रुपये असेल, तर तिमाही भाडे 1,500 रुपये असणार आहे. एवढेच नाही तर प्रवाशांना एकच स्मार्ट कार्ड वापरून कोची मेट्रो ट्रेन आणि वॉटर मेट्रोमध्ये प्रवास करता येणार आहे. तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही कोची वन अॅप वापरू शकता.

- वॉटर मेट्रो म्हणून चालवल्या जाणार्‍या बोटी कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधल्या आहेत. केरळ सरकारने जर्मनीच्या KFW च्या सहकार्याने या प्रकल्पाला निधी दिला आहे. यासाठी सुमारे 1,137 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

- वॉटर मेट्रोची सुरुवात पहिल्यांदा 8 इलेक्ट्रिक हायब्रीड बोटींसह होईल, नंतर त्यांची संख्या वाढविली जाईल.

- मेट्रो ट्रेनप्रमाणे ती पूर्णपणे वातानुकूलित असेल आणि दररोज 15 मिनिटांच्या अंतराने 12 तास धावणार आहे. सध्या 23 बोटी आणि सुरुवातीला 14 टर्मिनल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मेट्रोमध्ये 50 ते 100 प्रवासी बसू शकतात.

केरळमधील कोची शहरात सुरू होत असलेल्या वॉटर मेट्रो सेवेशिवाय सरकार मेट्रो लाइट, मेट्रो नियो आणि रिजनल रॅपिड ट्रांजिट सिस्टम सुरू करणार आहे. 

मेट्रो लाइट मेट्रो लाइट एक लो कास्ट मास रॅपिड ट्रांजिट सिस्टम आहे. मेट्रो लाइटही सामान्य मेट्रो प्रमाणे प्रवासादरम्यान आराम, वेळेची बचत करणारी व पर्यावरण पूरक असल्याचे सांगितले जात आहे. ही सेवा १५ हजारापर्यंत ट्रॅफिक असणाऱ्या टियर-२ आणि छोट्या शहरांमध्ये सुरू केली जाणार आहे. मेट्रो लाइटवर सामान्य मेट्रोच्या तुलनेत ६० टक्के कमी खर्च येतो.  जम्मू, श्रीनगर आणि गोरखपूर सारख्या शहरांमध्ये ही सेवा सुरु होणार आहे. 

मेट्रो नियोमेट्रो नियोमध्ये रोड स्लॅबवर चालणारे ओवरहेड ट्रॅक्शन सिस्टमने संचालित रबर टायर असणारे इलेक्ट्रिक कोच असतात. मेट्रो नियो सुद्धा प्रवासासाठी आरामदायक असून पर्यावरणास अनुकूल आहे. मेट्रो नियो पाहताना एक इलेक्ट्रिक बस ट्रॉलीसारखी दिसते. या सेवेसाठी गेज ट्रॅकची गरज नसते. नाशिक शहरात ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे.  रिजनल रॅपिड ट्रांजिट सिस्टम देशात  रिजनल रॅपिड ट्रांजिट सिस्टमवर काम सुरू आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र  म्हणजे एनसीआर अंतर्गत येणारे दोन शहरे, दिल्ली आणि मेरठला जोडण्यासाठी रिजनल रॅपिड ट्रांजिट सिस्टमची सुरुवात होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKeralaकेरळMetroमेट्रो