शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
2
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
3
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
4
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
5
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
6
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
7
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
8
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
9
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
10
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
11
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
12
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
13
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
14
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
15
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
16
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
18
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
19
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

मुस्लीम समुदायाशी पंतप्रधान करणार चर्चा, समान नागरी कायद्याची सांगणार गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 06:20 IST

Narendra Modi : समान नागरी कायदा करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: मुस्लीम समुदायाशी याबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी जुलै महिन्यात ‘मोदी मित्र’ संमेलनात मोदी समान नागरी कायद्याबाबत मुस्लिमांमध्ये पसरवत जात असलेला संभ्रम दूर करतील.

- संजय शर्मा नवी दिल्ली - समान नागरी कायदा करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: मुस्लीम समुदायाशी याबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी जुलै महिन्यात ‘मोदी मित्र’ संमेलनात मोदी समान नागरी कायद्याबाबत मुस्लिमांमध्ये पसरवत जात असलेला संभ्रम दूर करतील.

एका घरात दोन कायदे राहू शकत नाहीत, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये स्पष्ट संकेत दिले आहेत की हा कायदा लवकरात लवकर लागू होऊ शकतो. यापूर्वी पंतप्रधानांनी अनेकदा सुप्रीम कोर्टाच्या हवाल्याने विधाने केली आहेत. कोर्ट वारंवार म्हणत आहे की, समान नागरी कायदा लागू करा, असे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर समान नागरी कायदा लागू करण्याचा मुद्दा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोर अजेंड्यामध्ये समाविष्ट आहे. विधि आयोगानेही सर्व धर्म व सामाजिक संस्थांकडून याबाबत सूचना मागवलेल्या आहेत. देशाच्या एका वर्गात पसरवलेला संभ्रम व संशयाची स्थिती दूर करण्यासाठी आता दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदींनी आघाडी सांभाळली आहे.

प्रत्येक मतदारसंघात पाच हजार ‘मोदी मित्र’२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची मते वाढवण्यासाठी देशातील लोकसभेच्या सर्व ५४३ मतदारसंघांमध्ये पंतप्रधान मोदींच्या कार्यामुळे प्रभावित झालेल्या पाच-पाच हजार मुस्लिमांना ‘मोदी मित्र’ केले जाणार आहे. या ‘मोदी मित्रां’चे संमेलन पुढील महिन्यात दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित केले जाऊ शकते. या संमेलनाला संबोधित करण्याच्या बहाण्याने पंतप्रधान स्वत: मुस्लिमांशी संवाद साधणार आहेत.

मते वाढविण्याचा प्रयत्न२०१९मध्ये भाजपला ८ टक्के मुस्लिम मते मिळाली होती. मुस्लिमांची मते १५ ते २० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पसमंदा व बोहरा मुस्लिमांवर लक्ष केंद्रित केले जातेय.देशातील लोकसभेच्या ६५ मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदार ३० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत.  महाराष्ट्रातील भिवंडीसह तीन, बंगाल व आसाममधील सहा मतदारसंघ, बिहारमधील चार, हरियाणातील दोन, काश्मीर, केरळ व आंध्रातील प्रत्येकी पाच मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार