शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर जाणार, कार्यकर्त्यांसोबत टिफिन बैठक घेणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 15:15 IST

PM Narendra Modi Varanasi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 7 आणि 8 जुलै रोजी एकाच वेळी चार राज्यांना भेट देणार

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण होत असताना भाजपचे जनसंपर्क अभियान संपणार आहे. मात्र टिफिन बैठकीचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. भाजपच्या महामंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 7 आणि 8 जुलै रोजी एकाच वेळी चार राज्यांना भेट देणार आहेत. 7 जुलैला नरेंद्र मोदी गोरखपूर येथील गीता प्रेसला भेट देणार आहेत. यानंतर त्यांचा वाराणसी दौरा असणार आहे. यादरम्यान, नरेंद्र मोदी आपल्या लोकसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांसोबत टिफिन बैठक घेणार आहेत.

टिफिन बैठकीसाठी पन्नास हजार कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आहे. ज्यामध्ये काही नवीन आहेत, तर काही जुने असून त्यांनी पक्षाची दीर्घकाळ सेवा केली आहे. वाराणसीतील मंडुआडीह लहरतारा रस्त्यावरील विश्वनाथ लॉनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी टिफिन बैठक सुरू केली होती. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत ते टिफिन बैठका घेत होते.

पुन्हा टिफिन बैठक घेण्याचा निर्णयदिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे सर्व खासदार पुन्हा एकदा आपापल्या भागात टिफिन बैठक घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाजनसंपर्क अभियानात हा कार्यक्रम यापूर्वीही करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या अभिप्रायानंतर पुन्हा टिफिन बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावेळी केवळ आमदारांनाच नाही, तर खासदारांनाही तसे करण्यास सांगितले आहे.

नव्या-जुन्या कार्यकर्त्यांसोबत बैठकदेशभरातील भाजप खासदार त्याच दिवशी म्हणजे 8 जुलै रोजी आपापल्या लोकसभा मतदारसंघात टिफिन बैठक घेतील. या बैठकीत सुमारे पाचशे जणांना बोलावण्यास सांगण्यात आले आहे. त्यातील निम्मे जुने कार्यकर्ते असतील जे आता सक्रिय राजकारणात नाहीत. मात्र ज्यांनी दीर्घकाळ संस्थेसाठी काम केले आहे. या बैठकीत जुन्या कार्यकर्त्यांबरोबरच काही तरुण कार्यकर्त्यांनाही बोलवण्यास सांगण्यात आले आहे. दोन्ही प्रकारच्या लोकांची उपस्थिती असल्याने जुन्यांचा अनुभव नवीन कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल. या विचारातून हा उपक्रम सुरू करण्यात आला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसीBJPभाजपा