शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

“… काँग्रेसनं दहशतवादासमोर गुडघे टेकले,” कर्नाटकात मोदींचा ‘द केरल स्टोरी’चा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 15:42 IST

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक खोटी आश्वासनं, त्यांचा जाहीरनामा म्हणजे लॉकडाऊन आणि तुष्टीकरणाचा गठ्ठा, मोदींचा निशाणा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल झाले. कर्नाटकातील बेल्लारी येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी 'द केरल स्टोरी' या चित्रपटाचाही उल्लेख केला. “केरल स्टोरी हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. मेहनती, हुशार आणि बुद्धीमान लोकांच्या सुंदर भूमीसाठी ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये दहशतवादी कारस्थानांना कसं प्रोत्साहन दिलं जात आहे हे या चित्रपटात दाखवलं आहे,” असं मोदी म्हणाले. 

"काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक खोटी आश्वासनं आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे लॉकडाऊन आणि तुष्टीकरणाचा गठ्ठा आहे. आता काँग्रेसची अवस्था इतकी वाईट झाली आहे की त्यांचे पाय थरथर कापत आहेत आणि म्हणूनच माझ्या जय बजरंग बली बोलण्यावरही त्यांना आक्षेप आहे,” असं मोदी म्हणाले.

“आपल्या व्होटबँकसाठी काँग्रेसनं दहशतवादासमोर गुडघे टेकल्याचं पाहून मला आश्चर्य वाटलं. असा पक्ष कधी कर्नाटकाच्या सीमेचं रक्षण करू शकेल? कर्नाटकाला देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवण्यासाठी संरक्षण, कायदा सुव्यवस्था आवश्यक आहे. कर्नाटकाचं दहशतवाद मुक्त राहणंही तितकंच आवश्यक आहे. दहशतवादाविरोधात भाजपची भूमिका कठोर राहिलीये. जेव्हा दहशतवादावर कारवाई होते, तेव्हा काँग्रेसला पोटदुखी होते,” असंही ते म्हणाले.आपणच मान्य केलं…

“येडियुरप्पा आणि बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकारला केवळ साडेतीन वर्षच सेवा करण्याची संधी मिळाली. जेव्हा इंकडे काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा त्यांनी भ्रष्टाचाराला प्राधान्य दिलं. याचं कारण काय होतं? त्यांच्याच माजी पंतप्रधानांनी सांगितलं होतं. त्यांचं सरकार १०० पैसे पाठवतं तर १५ पैसेच गरीबांपर्यंत पोहोचतात. एकीकडे त्यांनीच मान्य केलं की काँग्रेस ८५ टक्के कमिशनचा पक्ष आहे. आज काँग्रेस समाजाचा नाश करणाऱ्या दहशतवादी प्रवृत्तीसोबत उभा आहे हे दुर्देव आहे,” असं मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक