शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 10:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिनन्यात जेव्हा अयोध्येला येणार आहेत. तेव्हा त्यांनी मशिदीचे भूमीपूजनही करावे, अशी विनंती अयोध्येतील मुस्लीम समाजाने केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला, अयोध्येतील राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात श्री रामलला सरकारची प्राण-प्रतिष्ठा होणार आहे. यासाठी श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधानांना अधिकृत निमंत्रणही देण्यात आले आहे. यातच, पंतप्रधान मोदींच्या या अयोध्या दौऱ्यापूर्वीच, त्यांनी नव्या मशिदीचेही भूमीपूजन करावे, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिनन्यात जेव्हा अयोध्येला येणार आहेत. तेव्हा त्यांनी मशिदीचे भूमीपूजनही करावे, अशी विनंती अयोध्येतील मुस्लीम समाजाने केली आहे. यासंदर्भात बोलताना इंडियन मुस्लिम लीगचे अध्यक्ष मोहम्मद इस्माईल अन्सारी म्हणाले, पंतप्रधान एका शुभ मुहूर्तावर अयोध्येत येत आहेत. त्यांना मशिदीचे काम सुरू करावे, अशी आम्ही त्यांना विनंती करतो. ही आमची मनापासून इच्छा आहे.

यासंदर्भात, इंडियन मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नजमुल हसन गनी म्हटले, सर्वोच्च न्यायालयाकडून धन्नीपूर येथे मशीद उभारण्यासाठी पाच एकर जमीन देण्यात आली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत येतच आहे, तर त्यांनी ऑल इंडिया इमाम संघठनेचे अध्यक्ष मौलाना डॉ. उमेर इलियासी आणि जामा मशीद दिल्लीचे  इमाम अहमद बुखारी यांनाही सोबत आणावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य सरकारकडून सोहावलमधील धन्नीपूर येथे देण्यात आलेल्या जमिनीवर मशिदीच्या बांधकामाचे भूमिपूजन करावे.

राम ललांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला २५०० दिग्गज उपस्थित राहणार -जगभरातील भारतीयांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले असल्याने भव्य आणि दिव्य सोहळ्याची तयारी सुरू आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणातून अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख केला होता. आता, राम ललांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह २५०० दिग्गजांची उपस्थिती असणार आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरMuslimमुस्लीमMosqueमशिद