शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नेटवर्कच्या समस्यांपासून मिळणार सुटका! सर्व गावांमध्ये बसवले मोबाईल टॉवर जाणार, मोदींनी दिली डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 12:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'यूएसओएफ प्रकल्पांतर्गत मोबाईल टॉवर आणि ४ जी कव्हरेज'चाही आढावा घेतला.

नवी दिल्ली : देशातील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्कच्या समस्या आहेत. यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंतिम मुदत (डेडलाइडन) निश्चित केली आहे. संपूर्ण मोबाइल फोन नेटवर्क कव्हरेज प्राप्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व विभागांना मार्च २०२४ पर्यंत भारतातील सर्व गावांमध्ये मोबाइल टॉवर बसवण्यासाठी सांगितले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मोबाईल नेटवर्कच्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त करताना नरेंद्र मोदींनी जोर दिला की, धरणांच्या बांधकामाबाबत स्थानिक लोकांकडून आक्षेप असू शकतात, परंतु मोबाईल नेटवर्क वाढविण्यासाठी स्थानिक लोक मोबाईल टॉवर्सच्या स्थापनेला पाठिंबा देऊ शकतात. दरम्यान, 'प्रगती'च्या बैठकीत नरेंद्र मोदींनी ही माहिती दिली आहे.

यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'यूएसओएफ प्रकल्पांतर्गत मोबाईल टॉवर आणि ४ जी कव्हरेज'चाही आढावा घेतला. तसेच, या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी धरणांच्या बांधकामाची तुलना मोबाईल टॉवर्सच्या स्थापनेसोबत केली, कारण अधिकाऱ्यांनी विलंबाची कारणे म्हणून जमीन आणि दुर्गम ठिकाणांची अनुपलब्धता सांगितली. एका सूत्राने सांगितले की, अधिकार्‍यांनी काम पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ लागेल असे सुचवले असताना, पंतप्रधानांनी आर्थिक वर्षाच्या अखेरीस हे काम पूर्ण करावे असे सुचवले. 

सुमारे चार महिन्यांतील पहिल्या 'प्रगती' बैठकीत पंतप्रधानांनी गुजरातमधील ६६ टॉवर्सच्या उभारणीला होत असलेल्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली. मोबाईल फोन नेटवर्कचे संपूर्ण कव्हरेज प्राप्त करण्यासाठी, सरकारने विविध एजन्सींच्या केंद्रीकृत अधिकाराच्या (RoW) मंजुरीसाठी 'गतीशक्ती संचार' ही समर्पित वेबसाइट तयार केली आहे. दरम्यान, प्रगती हे ‘प्रो-एक्टिव्ह गव्हर्नन्स’ आणि वेळेवर अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञान-आधारित व्यासपीठ आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा समावेश आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान