शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

PM मोदी लवकरच २ कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत?; लाल किल्ल्यावरील भाषणातून दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 11:57 IST

आगामी काळात केंद्र सरकारकडून आणखी कठोर निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेतही दिले आहेत.

PM Narendra Modi Speech ( Marathi News ) :पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून देशातील विविध मुद्द्यांना स्पर्श केला. तसंच आगामी काळात केंद्र सरकारकडून आणखी कठोर निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेतही दिले आहेत. यामध्ये समान नागरी कायद्यासह वन नेशन, वन इलेक्शन यांसारख्या निर्णयाचा समावेश असू शकतो. 

देशभरातील निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या निर्णयाचे संकेत देताना नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, "आपल्या देशात एखादी योजना राबवत असताना त्याचा संबंध निवडणुकांशी जोडला जातो. निवडणूक जवळ आल्यानेच योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता वन नेशन, वन इलेक्शनबाबत व्यापक चर्चा होऊ लागली आहे. राजकीय पक्षांनी याबाबत आपले विचार मांडले असून एका समितीनेही याबाबतचा अहवाल मांडला आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाने वन नेशन, वन इलेक्शनसाठी पुढे आलं पाहिजे," असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

समान नागरी कायद्याचाही विचार होणार?

देशात मागील अनेक वर्षांपासून समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा होते. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. "आपल्या देशात मागील ७५ वर्षांपासून कम्युनिल सिव्हिल कोड आहे. यामध्ये आता बदल झाला पाहिजे. आपण सेक्युलर सिव्हिल कोडच्या दिशेने जायला पाहिजे. ज्यामुळे आगामी काळात देशाला धर्माच्या आधारे होणाऱ्या भेदभावापासून मुक्ती मिळेल," असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, "जाती-पातीच्या वरती जाऊन प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवला जातो, तेव्हा देशाची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचं दिसतं. मध्यमवर्गीय कुटुंबांना उत्तम जीवन जगण्याची अपेक्षा असते. मी एक स्वप्न पाहिले आहे की, २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण झाला, तर त्याचा एक घटक असा असेल की, सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात हस्तक्षेप करू नये. ससरकारमुळे कोणताही त्रास, अडथळा निर्माण होऊ नये. परंतु सरकारची गरज भासल्यास प्रशासन मदतीला उपलब्ध असेल," असंही त्यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींनी सांगितला देशवासियांच्या स्वप्नातील भारत

देशवासीयांना आपला भारत कसा असावा, याबाबत नेमके काय वाटते, याची एक यादीत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात वाचून दाखवली. विकसित भारतासाठी सरकारने सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. हजारो देशवासीयांनी सल्ला, सूचना सरकारला पाठवल्या, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आणि यादी वाचून दाखवली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndependence Dayस्वातंत्र्य दिन