शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : "मी रोज 2-3 किलो शिव्या खातो, देवाच्या आशीर्वादाने मला..."; नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 17:48 IST

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना अंधश्रद्धेवरून टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी तेलंगणा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "लोक मला विचारतात तुम्ही थकत नाहीत का? त्यावर मी रोज 2-3 किलो शिव्या खातो म्हणून थकत नाही. देवाच्या आशीर्वादाने मला दिलेल्या शिव्या न्यूट्रीशनमध्ये बदलतात" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं नाव न घेता ते भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. "राज्याला 'कुटुंब नव्हे, प्रथम जनतेचे' सरकार हवे आहे. तुम्ही मोदींना शिव्या द्या, भाजपाला शिव्या द्या, पण तुम्ही तेलंगणातील जनतेला शिव्या दिल्या तर तुम्हाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल" असंही म्हटलं आहे.

पंतप्रधानांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मोदींनी मला तेलंगणातील कामगारांसाठी वैयक्तिकरित्या प्रार्थना करायची आहे. हताश, भीती आणि अंधश्रद्धेतून काही लोक मोदींच्या विरोधात अनेक शिव्या देतील. त्यांच्या फसवणुकीमुळे दिशाभूल होऊ नये अशी मी प्रार्थना करतो असं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत राज्य सरकार जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारच्या अंधश्रद्धेवर लगावला टोला

पीएम मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना अंधश्रद्धेवरून टोला लगावला आहे. कुठे राहायचे, कुठे पद भूषवायचे, कोणाला मंत्री करायचे हे सर्व महत्त्वाचे निर्णय अंधश्रद्धेच्या धर्तीवर घेतले जात असल्याचा दावा त्यांनी केला. "सामाजिक न्यायातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. तेलंगणा हे माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र आहे. पण, या आधुनिक शहरात अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिले जात आहे, ही खेदाची बाब आहे. तेलंगणाचा विकास करायचा असेल, तर सर्वप्रथम अंधश्रद्धा इथून दूर कराव्या लागतील" असं म्हटलं आहे. 

ऑनलाईन पेमेंटमुळे कमी झाला भ्रष्टाचार 

तपास यंत्रणा आपल्या भ्रष्टाचाराची चौकशी करतील या भीतीने विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. ते म्हणाले की, सरकारने डिजिटल व्यवहार आणि ऑनलाईन पेमेंटला प्रोत्साहन दिले. त्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. कारण, यातून सर्वांचे वास्तव समोर येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTelanganaतेलंगणाBJPभाजपाPoliticsराजकारण