PM Narendra Modi Podcast : काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्यासोबत पॉडकास्टमध्ये भाग घेतला होता. यात त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. आता पीएम मोदी आंतरराष्ट्रीय पॉडकास्टमध्ये भाग घेणार आहेत. प्रसिद्धअमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी पीएम मोदी पॉडकास्टमध्ये विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. खुद्द फ्रीडमन यांनी ही माहिती दिली आहे.
फ्रीडमन यांनी रविवारी एक्सवर पोस्ट करत या पॉडकास्टची माहिती दिली. ते फेब्रुवारीच्या अखेरीस पंतप्रधान मोदींसोबत पॉडकास्ट करतील. या पॉडकास्टबद्दल मी खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. या पॉडकास्टच्या निमित्ताने त्यांची ही पहिलीच भारतभेट असेल. फ्रीडमनही याबद्दल खूप उत्सुक आहे.
कोण आहेत लेक्स फ्रिडमन? फ्रीडमन अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि पॉडकास्टर आहेत. लेक्स फ्रीडमन 2018 पासून पॉडकास्ट करत आहे. त्यांनी विविध क्षेत्रातील (विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि राजकारण) अनेक नामवंत व्यक्तींसोबत पॉडकास्ट केले आहेत. यामध्ये इलॉन मस्क, जेफ बेझोस, डोनाल्ड ट्रम्प, मार्क झुकेरबर्ग आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की इत्यादींचा समावेश आहे. फ्रीडमनचे YouTube चॅनेलवर 4.5 मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत.
निखिल कामथसोबत पहिला पॉडकास्ट पंतप्रधान मोदींचा हा दुसरा पॉडकास्ट असेल. यापूर्वी त्यांनी निखिल कामथ यांच्यासोबत पहिले पॉडकास्ट केले. या मुलाखतीत पीएम मोदींनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य, राजकारण आणि भारताच्या भविष्याविषयी भाष्य केले होते.