शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi Mann Ki Baat: भारतात तयार झालेल्या वस्तूंना जगभरात मागणी, निर्यातीतही ऐतिहासिक वाढ; पंतप्रधानांनी सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 13:19 IST

भारतानं ४०० अब्ज डॉलर्सचं निर्यातीचं ध्येय गाठलं आहे. हे भारताच्या क्षमतेला दर्शवतं : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narndra Modi) यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. पाचा राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर त्यांनी या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. "भारतानं ४०० अब्ज डॉलर्सचं निर्यातीचं ध्येय गाठलं आहे. हे भारताच्या क्षमतेला दर्शवतं. याचाच अर्थ जगभरात भारतीय वस्तूंची मागणी वाढत आहे," असं ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जाणार असल्याचंही सांगितलं. "आज संपूर्ण जगात योग आणि आयुर्वेदाप्रती कल वाढत आहे. गेल्या आठवड्यात कतारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका योग कार्यक्रमात ११४ देशांच्या नागरिकांनी भाग घेत एक जागतिक विक्रम स्थापन केला. आयुष उद्योगाची बाजारपेठ सतत विस्तारत आहे. सहा वर्षांपूर्वी आयुर्वेदाशी संबंधित औषधांची बाजारपेठ २२ हजार कोटींच्या आसपास होती. आज आयुष उत्पादन उद्योग सुमारे एक लाख ४० हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे," असंही ते म्हणाले."अमृत सरोबत बांधले जाऊ शकतात"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ अमृत सरोवर बांधले जाऊ शकतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. काही जुन्या तलावांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते, काही नवीन बांधले जाऊ शकतात. या दिशेने तुम्ही नक्कीच काही प्रयत्न कराल याची मला खात्री आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

जलसंधारणावर भरआपल्या संबोधनादरम्यान पंतप्रधान मोदींनी जलसंधारणावर भर दिला. "मी अशा राज्यातून आलो आहे जिथे नेहमीच पाण्याची टंचाई असते. गुजरातमध्ये या विहिरींना (Stepwells) वाव म्हणतात. गुजरातसारख्या राज्यात वावने मोठी भूमिका बजावली आहे. या विहिरी संरक्षणासाठी 'जल मंदिर योजने'ने मोठी भूमिका बजावली आहे. संपूर्ण गुजरातमध्ये अनेक विहिरंचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. त्यामुळे या भागातील पाणीपातळी वाढण्यासही मोठी मदत झाली. तुम्ही स्थानिक पातळीवरही अशाच प्रकारच्या मोहिमा चालवू शकता. देशातील अनेकांनी जलसंधारण हाच जीवनाचा एकमेव उद्देश बनवला आहे, याचा मला आनंद आहे," असंही मोदी म्हणाले.

निर्यात ४०० अब्ज डॉलर्सवरएकेकाळी भारतातून निर्यातीचा आकडा १०० अब्ज, कधी १५० अब्ज होता, आज भारत ४०० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतात तयार उत्पादनांची मागणी जगभरात वाढत आहे असा याचा अर्थ आहे. दुसरे म्हणजे भारताची पुरवठा साखळी दिवसेंदिवस मजबूत होत आहे. पूर्वी असं मानलं जात होतं की केवळ मोठे लोकच सरकारला उत्पादनं विकू शकतात, परंतु सरकारी ई-मार्केटप्लेस पोर्टलनं हे चित्र बदलले आहे. त्यातून नव्या भारताची भावना दिसून येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.बाबा शिवानंद यांचा उल्लेखकार्यक्रमात मोदींनी बाबा शिवानंद यांचा उल्लेख केला. नुकत्याच पार पडलेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात तुम्ही बाबा शिवानंद यांना पाहिलं असेल, असं मोदी म्हणाले. १२६ वर्षे वय असतानाही त्यांची चपळता पाहून माझ्या प्रमाणेच सर्वांनाच आश्चर्य वाटले असेल आणि काही सेकंदातच ते नंदीमुद्रेत प्रणाम करू लागले. मी पण बाबा शिवानंदजींना नतमस्तक झालो, असंही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत