शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासानं मला नव्हे, तर माझ्या देशाला लक्षात ठेवावं- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 11:37 IST

विरोधकांच्या टीकेवरही मोदींचं भाष्य

लंडन: इतिहासानं मला लक्षात ठेवावं असं वाटत नाही. सव्वाशे कोटी भारतीयांप्रमाणेच मला लक्षात ठेवलं जावं, हीच माझी इच्छा आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. लंडनमध्ये आयोजित 'भारत की बात, सबके साथ' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी गीतकार आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या प्रश्नांना मोदींनी उत्तर दिलं. तुम्हाला इतिहासानं नेमकं कसं लक्षात ठेवावं असं वाटतं, असा प्रश्न प्रसून जोशी यांनी मोदींवा विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी वेदांचं उदाहरण दिलं. 'वेद कोणी लिहिले होते हे कोणाला माहित आहे का? जगातल्या इतक्या प्राचीन ग्रंथाची रचना करणाऱ्या व्यक्तीचं नाव कोणाला माहित नसेल, तर मग मोदी कोण आहे? मी खूपच लहान व्यक्ती आहे. इतिहासात स्थान मिळवण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. मला सव्वाशे कोटी भारतीयांप्रमाणेच लक्षात ठेवलं जावं. जगानं माझ्या देशाला लक्षात ठेवावं. माझा देशच जगाला समृद्धतेचा मार्ग दाखवेल,' असं मोदींनी म्हटलं. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेवरही मोदींनी यावेळी भाष्य केलं. 'विरोधकांची टीका लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. मोदी सरकारवर खूप टीका व्हावी, असं मला वाटतं. कारण टीकेमुळेच लोकशाही जिवंत राहते. त्यामुळे सरकारदेखील कायम सतर्क राहतं. त्यामुळे जर कोणी माझ्यावर टीका करत असेल, तर ते मी माझं भाग्य समजतो,' असं मोदींनी म्हटलं. सध्या टीका करण्याऐवजी आरोप केले जातात, असंही त्यांनी म्हटलं. 'टीका करण्यासाठी मेहनत करावी लागते. मात्र आता लोकांकडे त्यासाठी वेळ नाही. त्यामुळे लोक टीका करण्याऐवजी थेट आरोप करतात. हे लोकशाहीसाठी घातक आहे. टीका करायला हवी. मात्र आरोप केले जाऊ नयेत. मी नेहमीच टीकेचं स्वागत करतो. मला अनेकांनी घडवलंय. त्यांची मेहनत मी वाया जाऊ देणार नाही,' असंही मोदींनी म्हटलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLondonलंडन