शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ऑक्टोबरला केदारनाथ-बद्रीनाथ दौऱ्यावर? जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 16:14 IST

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हिमालयातील मंदिरांच्या प्रस्तावित दौऱ्याबाबत येथील जिल्हा प्रशासनाने अधिकारी मौन बाळगून आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीपूर्वी बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांच्या संभाव्य दौऱ्यावर असणार आहे. यासाठी येथील जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हिमालयातील मंदिरांच्या प्रस्तावित दौऱ्याबाबत येथील जिल्हा प्रशासनाने अधिकारी मौन बाळगून आहेत. मात्र, सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी  बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांमध्ये प्रार्थना करतील आणि तेथे सुरू असलेल्या पुनर्बांधणी प्रकल्पांचा आढावा घेतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा केदारनाथला जाणार असून तेथे ते पूजा करतील आणि तेथे सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतील. त्यानंतर ते बद्रीनाथ मंदिराला भेट देतील. यानंतर बद्रीनाथ मास्टर प्लॅन अंतर्गत हाती घेतलेल्या प्रकल्पांचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

सुत्रांच्या म्हणण्यानुसार, जवळपास आठवडाभर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावित दौऱ्याची तयारी सुरू आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी माना या सीमावर्ती गावाला भेट देण्याची शक्यता आहे. याठिकाणी गावकरी आणि जवानांशी चर्चा करण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यंदाही पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करणार?दरम्यान,  दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय सैन्यातील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यास असल्याचे सांगण्यात येते. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यावेळी त्यांनी जवानांना मिठाई भरवली होती. तसेच जवानांची विचारपूस केली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKedarnathकेदारनाथHimachal Pradeshहिमाचल प्रदेश