शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सीतारामन यांची खुर्ची धोक्यात; अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 22:49 IST

अर्थमंत्री बदलण्याचा संघाचा सल्ला; पंतप्रधान अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री बदलण्याची शक्यता

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र अर्थमंत्री म्हणून हा त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प ठरू शकतो. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री बदलण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्री पदावरुन हटवण्यात यावं, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोदींना देण्यात आला आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांची खुर्ची धोक्यात असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. यानंतर त्यांना अर्थमंत्री पदावरुन दूर केलं जाऊ शकतं. तशा सूचना पंतप्रधान मोदींना संघाकडून देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अर्थसंकल्पाच्या दृष्टीनं अर्थ मंत्रालयाच्या महत्त्वाच्या बैठका सुरू आहेत. मात्र या बैठकांना निर्मला सीतारामन अनुपस्थित होत्या. त्यावरुन त्यांच्यावर बरीच टीकादेखील झाली होती. त्यामुळे आता सीतारामन यांना हटवून त्यांच्या जागी संघाच्या जवळच्या व्यक्तीची अर्थमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

निर्मला सीतारामन केवळ औपचारिक अर्थमंत्री आहेत. अर्थ मंत्रालयाची सूत्रं त्यांच्या हाती नाहीत, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाच्या, उद्योजकांच्या बैठका सुरू आहेत. मात्र या बैठकांना सीतारामन उपस्थित राहिलेल्या नाहीत. कारण त्या केवळ नामधारी आहेत. अर्थ मंत्रालयाची सर्व सूत्रं पंतप्रधान कार्यालयाकडे आहेत आणि ही बाब काळजी करण्यासारखी असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प ५ जुलै २०१९ रोजी मांडला. मोदी सरकार-१ मध्ये सीतारामन यांनी उद्योगमंत्री (२६ मे २०१४ ते ३ सप्टेंबर २०१७) म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांच्याकडे संरक्षण मंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला. ३ सप्टेंबर २०१७ ते ३० मे २०१९ दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रिपदाची धुरा सांभाळली. इंदिरा गांधींनंतर या पदाची पूर्णवेळ धुरा सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. मोदी सरकार-२ मध्ये त्यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. पूर्ण वेळ अर्थ मंत्रालयाचा कारभार पाहणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनbudget 2020बजेटRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघEconomyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण