शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना, बॅस्टिल-डे सोहळ्यात होणार सहभागी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 08:48 IST

१४ जुलैला होणाऱ्या फ्रान्समधील बॅस्टिल डे सोहळ्याला नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यासाठी गुरुवारी सकाळी नवी दिल्लीहून पॅरिसला रवाना झाले. या दौऱ्यात भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संरक्षण संबंधांच्या विस्ताराला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १४ जुलैला होणाऱ्या फ्रान्समधील बॅस्टिल डे सोहळ्याला नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इतर फ्रेंच मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. तसेच, नरेंद्र मोदी भारतीय समुदाय आणि काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुद्धा संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे भारत फ्रान्सकडून २६ राफेल आणि ३ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करू शकतो. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान राफेल खरेदीसाठी फ्रान्स आणि भारत सरकारमधील कराराला अंतिम रूप दिले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.

दरम्यान, १४ जुलैला होणार्‍या फ्रान्सच्या वार्षिक बॅस्टिल-डे परेडमध्ये भारताच्या तिन्ही सैन्यांच्या २६९ सदस्यीय दल सुद्धा सहभागी होणार आहे. यावेळी, फ्रेंच विमानांसह, भारतीय हवाई दलाची (IAF) तीन राफेल लढाऊ विमाने देखील फ्लायपास्टमध्ये सहभागी होतील. तसेच, इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी संरक्षण, अंतराळ, व्यापार आणि गुंतवणूक यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात फ्रान्स आणि भारत यांच्यातील सहकार्य पुढे नेण्यासाठी नरेंद्र मोदी चर्चा करतील.

फ्रान्स दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी अबुधाबीलाही जाणार आहेत. नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी ट्विट केले की, "पॅरिसला रवाना होत आहे, जिथे मी बॅस्टिल डे सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे. मी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इतर फ्रेंच मान्यवरांशी चर्चेसाठी उत्सुक आहे. इतर कार्यक्रमांमध्ये भारतीय समुदाय आणि शीर्ष सीईओ यांच्याच्यासोबत होणाऱ्या चर्चेत सहभाग घेणार आहे."

लष्कराचे सामर्थ्य आणखी बळकट होणार! गेल्या काही वर्षांत भारताचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे. ते आणखी बळकट करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यामुळे भारत फ्रान्सकडून २६ राफेल लढाऊ विमाने आणि ३ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव संरक्षण दलाने संरक्षण मंत्रालयासमोर ठेवला आहे. नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान राफेल खरेदीचा करार होऊ शकतो. हा करार ९० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो, असा अंदाज आहे. मात्र, अंतिम खर्च करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरच समजणार आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFranceफ्रान्सRafale Dealराफेल डील