शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींकडून तेलंगणाला 13 हजार 500 कोटींची भेट, शेतकऱ्यांसाठीही केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 16:43 IST

नरेंद्र मोदी म्हणाले की, 2014 मध्ये एलपीजी कनेक्शनची संख्या सुमारे 14 कोटी होती, जी आता 32 कोटींहून अधिक झाली आहे.

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात 13 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, 2014 मध्ये एलपीजी कनेक्शनची संख्या सुमारे 14 कोटी होती, जी आता 32 कोटींहून अधिक झाली आहे. अलीकडेच आम्ही गॅस सिलिंडरच्या किमतीही कमी केल्या आहेत.

रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील 13 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसेच, यावेळी नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. 

नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील अनेक मोठे आर्थिक कॉरिडॉर तेलंगणातून जात आहेत. सर्व राज्यांना पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांशी जोडण्याचे हे माध्यम बनतील. तसेच, आज मी तेलंगणाच्या भूमीवरून घोषणा करत आहे की, केंद्र सरकारने हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली आहे.

महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेखसणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. नवरात्र सुरू होणार आहे, पण संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करून आपण त्याआधी 'शक्ती'ची पूजा करण्याची भावना प्रस्थापित केली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, 13 हजार 500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी मी तेलंगणाचे अभिनंदन करतो. आज असे अनेक रस्ते जोडणी प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, जे लोकांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतील, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नागपूर-विजयवाडा कॉरिडॉरमधून वाहतूक होईल सुलभ नागपूर-विजयवाडा कॉरिडॉरच्या माध्यमातून तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रवास करणे सोयीचे होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच. या कॉरिडॉरमुळे या तिन्ही राज्यांतील व्यापार, पर्यटन आणि उद्योगाला चालना मिळेल. याशिवाय, या कॉरिडॉरमध्ये आर्थिक केंद्रांची ओळख करण्यात आली आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTelanganaतेलंगणा