शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या अपेक्षांपेक्षा तुमची कामगिरी उत्तम', PMO कर्मचाऱ्यांशी मोदींनी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 13:14 IST

लोकांच्या अपेक्षेमुळे आणि विश्वासामुळे कामाचा तणाव वाढतो.

नवी दिल्ली : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी नवे सरकार स्थापन करण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयातील (PMO) कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी माझ्या अपेक्षांपेक्षा तुमची कामगिरी उत्तम असल्याचे सांगत कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. 

आपली स्वप्ने कितीही सुंदर असली, संकल्प कितीही दृढ असला आणि हेतू कितीही चांगला असला तरी समर्पित टीम नसेल तर अपेक्षित यश मिळणे अत्यंत कठीण असते. पाच वर्षात अखंड एकनिष्ठ साधना, ज्याचे लक्ष देशातील सामान्य व्यक्तीच्या जीवनात आशा आणि बदल करणे. या सर्व कामांचे क्रेडिट तर पंतप्रधान कार्यालयाला जाते, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

याचबरोबर, गेल्या पाच वर्षात 2014 ते 2019 दरम्यान आम्ही आपल्या कामात कधीही अडथळा आणला नाही. लोकांच्या अपेक्षेमुळे आणि विश्वासामुळे कामाचा तणाव वाढतो. पण, ताकद सुद्धा वाढते. या विश्वासामुळेच वाढलेले काम ओझे न वाटता त्याचे ऊर्जेत रूपांतर झाले. त्या ऊर्जेने अधिक काम करण्याचे, निर्णय घेण्याचे बळ दिले. या संपूर्ण प्रवासात आपण सर्वांनी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले. मला एकटे पडू दिले नाही, असेही  नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

काल शुक्रवारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत सध्याची 16वी लोकसभा विसर्जित करण्याचा आणि नरेंद्र मोदी यांच्या आभाराचा, असे दोन प्रस्ताव पारित करण्यात आले. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले. त्यानंतर राष्ट्रपतींनी सुद्धा त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या इनिंग्जची जय्यत तयारी सुरू झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी बहुधा येत्या गुरुवारी 30 मे रोजी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान