शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Happy New Year 2020 : चाहत्याला पंतप्रधान मोदींनी दिली नववर्षाची खास भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 12:38 IST

पंतप्रधान मोदींनी आपल्या एका चाहत्याला नववर्षाची खास भेट दिली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींनी आपल्या एका चाहत्याला नववर्षाची खास भेट दिली आहे.अंकित दुबे असं या ट्विटर युजरचं नाव आहे. पंतप्रधान मोदींनी अंकितची इच्छा पूर्ण करून त्याला सुखद धक्का दिला आहे. 

नवी दिल्ली - नववर्षाचे मोठ्या दणक्यात स्वागत करण्यात आले आहे. सरत्या वर्षाला निरोप देत उत्साहात 2020 चे स्वागत झाले. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतषबाजी करत नववर्षाचे दणक्यात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरातील लोकांनीही ट्विटरवरून मोदींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान मोदींनी आपल्या एका चाहत्याला नववर्षाची खास भेट दिली आहे. नववर्षाच्या निमित्ताने मोदींच्या एका चाहत्याने ट्विटरवरून एक इच्छा व्यक्त केली होती. अंकित दुबे असं या ट्विटर युजरचं नाव आहे. अंकितने आपण पंतप्रधानांचे चाहते आहोत आणि त्यांच्याकडून आपल्याला नवीन वर्षाची मिळेल का? असं ट्विट केलं होतं. पंतप्रधान मोदींनी अंकितची ही इच्छा पूर्ण करून त्याला सुखद धक्का दिला आहे. 

'आदरणीय पंतप्रधान, मी तुमचा मोठा चाहता आहे. मला नववर्षाची तुमच्याकडून एक भेट मिळेल का? मी तुम्हाला फॉलो करतो. तुम्ही मला Twitter वर फॉलो बॅक कराल का?' असं ट्विट अंकितने केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी त्याला फॉलो करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत नववर्षाची खास भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी उत्तम काम करणाऱ्या तसेच संकल्प पुढे नेणाऱ्या काही लोकांचं ट्विट रिट्विट केलं आहे. अंबिकापूर येथील शाळेच्या विद्यार्थ्यांचं ट्वीट त्यांनी याच प्रकारे शेअर केलं. तसेच प्लास्टिक वापर बंदीच्या उपक्रमाला पुढे नेणाऱ्या अनेकांचं मोदींनी कौतुक केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. '2020 च्या हार्दिक शुभेच्छा! नववर्षात सर्वांना सुख-समृद्धी, सदृढ आरोग्य लाभो', अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बुधवारी (1 जानेवारी) हे ट्विट केलं. तसेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सरत्या वर्षाला निरोप देत त्यांनी 2020 हे वर्ष देशवासियांच्या जीवनात आनंद घेऊन येईल अशी प्रार्थना केली आहे. '2020 हे वर्ष भारताला बदलण्यासाठी लोकांना सशक्त करेल आणि प्रत्येक देशवासी सक्षम, सबळ होईल अशी आशा करूया' असं ट्विट करण्यात आले आहे. मोदींनी NaMo 2.0 या ट्विटर हँडलने केलेल्या एका ट्विटच्या उत्तरादाखल हे ट्विट केले आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटरNew Yearनववर्ष