शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार मेळाव्यात ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप; PM मोदी म्हणाले, "नवा भारत कमाल करत आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 12:17 IST

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कर्मचाऱ्यांना संबोधित करून त्यांचे अभिनंदन केले.

नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विविध सरकारी विभागांमध्ये भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप केले. या रोजगार मेळाव्यात नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. देशभरात ४६ ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या तरुणांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, "२०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचे आहे. भारतात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. नवा भारत कमाल करत आहे."

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कर्मचाऱ्यांना संबोधित करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सरकारी सेवांसाठी आज नियुक्ती पत्र मिळालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन. तुम्हा सर्वांनी अथक परिश्रमानंतर हे यश मिळवले आहे. लाखो उमेदवारांमधून तुमची निवड झाली आहे, असे नरेंद्र  मोदी म्हणाले.

गेल्या ९ वर्षांत आमच्या योजनांनी आणखी मोठी उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आमची धोरणे नवीन मानसिकता, सामग्री निरीक्षण, मिशन मोड अंमलबजावणी आणि लोकसहभागावर आधारित आहेत. ९ वर्षात सरकारने मिशन मोडवर धोरणे लागू केली आहेत, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच, ते म्हणाले, ''मित्रांनो, देशाच्या विकासाच्या प्रवासात तुम्हा सर्वांना थेट सरकारसोबत काम करण्याची संधी मिळत आहे. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, भारताचा संकल्प सार्थकी लावल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन."

याचबरोबर, गेल्या ९ वर्षांत नाविन्यपूर्ण पद्धतीने मोठे बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने भ्रष्टाचार कमी होऊन सुविधा वाढल्या आहेत, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान,  यापूर्वी २८ ऑगस्ट रोजी ८ व्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये नरेंद्र मोदींनी ५१ हजार १०६ तरुणांना नियुक्तीपत्रे दिली होती. या रोजगार मेळाव्यात नियुक्त करण्यात येणारे नवीन कर्मचारी टपाल विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये आपली सेवा देतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरी