शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election 2020 : शाहीन बाग हिंसाचार योगायोग नव्हे, तर कट- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 20:50 IST

केजरीवालांनी गरिबांचा हक्क हिरावून घेतला आहे.

नवी दिल्लीः  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्या केजरीवालांवर लोकपाल, बाटला हाऊस एन्काऊंटर आणि CAA विरोधात शाहीन बाग सुरू असलेल्या हिंसाचारावरून टीकास्त्र सोडलं आहे. देशाच्या सौहार्दाला खंडित करण्यासाठी ही सर्व कटकारस्थानं सुरू आहेत, असं मोदी म्हणाले आहेत. दिल्लीत मोदी सरकार येण्याआधी दहशतवादी हल्ले होत होते, परंतु ते आता थांबले आहेत. गुन्हेगारांना दिल्ली पोलिसांनी ठार केल्यावर ते बनावट एन्काऊंटर असल्याचा कांगावा करण्यात आला. शाहीन बागच्या मुद्द्यावरूनही मोदींनी काँग्रेस आणि आपवर हल्लाबोल केला आहे. शाहीन बाग हिंसाचार योगायोग नव्हे, तर कट असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. तसेच दिल्लीच्या लोकांना विकासासाठी सुरक्षित वातावरण पाहिजे होतं. केजरीवालांनी गरिबांचा हक्क हिरावून घेतला आहे. दिल्लीतल्या लोकांनी परिवर्तनाचं मन बनवलं असून, सर्वच स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत मोदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कडकडडुमामध्ये पोहोचले असून, त्यांनी एका रॅलीला संबोधित केलं आहे. 

दिल्ली फक्त शहरच नसून त्याला वारसा लाभलेला आहे. दिल्लीनं नेहमीच सर्वांचा सत्कार केलेला असून, सगळ्यांनाच स्वीकारलेलं आहे. फाळणीनंतर आलेल्या किंवा इतर राज्यांतील भारतीयांना दिल्लीनं आपल्या हृदयात सामावून घेतलं आहे. दिल्लीतल्या सातही जागा आम्हाला देऊन दिल्लीचे लोक कोणत्या दिशेनं विचार करतात हे समजलं आहे.देश बदलवण्यात दिल्लीच्या लोकांचं मोठं योगदान आहे. आता मतदार मतांनी दिल्लीसुद्धा बदल घडवणार आहेत. आम्ही संसदेत दिल्लीला अवैधरीत्या कॉलनीच्या समस्यांपासून मोकळं केलं आहे. आता दिल्लीच्या लोकांना सरकारी बुलडोझरला घाबरण्याची गरज नाही. जिथे झोपड्या आहेत, तिथे पक्की घरं देण्यात येणार  आहेत. पक्क्या घरात गॅस कनेक्शन, नळ, पाणी यांसारख्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

भाजप नकारात्मकतेचं नव्हे तर सकारात्मकतेवर विश्वास ठेवते. देशासाठी आम्ही केलेले संकल्प मोठे आहेत. देशासमोरली शेकडो आव्हाने आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अवैध कॉलनींचा प्रश्न कोणीही सोडवला नव्हता. कोर्टात तारखांवर तारखा पडत होत्या. पण तो प्रश्न आम्ही सोडवून दाखवला. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूक