शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील दुर्घटनेवर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मदत घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 08:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन मोदींना गौरविण्यात येणार आहे.

ठाणे - समृद्धी महामार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूरजनिक पुलावरील काम सुरू असताना ग्रेडर मशिन कोसळल्याने मोठा अपघात झाला. त्यामध्ये, १७ कामगारांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री सरलांबेजवळ ही दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, अपघातस्थळी भेट देत पाहणीही केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मध्यरात्रीच घटनेची माहिती घेत संबंधित यंत्रणांना मदतीचे निर्देश आले आहेत. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन शहापूर दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन मोदींना गौरविण्यात येणार आहे. त्याच, पार्श्वभूमीवर  पुण्यात मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा कार्यक्रम होत आहे. दरम्यान, ठाण्यातील शहापूरजवळ भीषण दुर्घटना घडली. येथील पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळून मोठा अपघात झाला. त्यात, १७ जणांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. घटनास्थळावरुन आत्तापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून डॉग स्कॉड पथकासह अद्यापही कामगारांचा शोध घेण्यात येत आहे. एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शहापूर दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. शहापूर दुर्घटनेच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गपासून ५ ते ६ किलोमीटर ग्रामीण भागात असलेल्या सरलांबे गावच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी  काल रात्री ११ वाजल्याच्या सुमारास १७ कामगार आणि९  इंजिनियर उपस्थितीत काम सुरू असतानाच अचानक लॉन्चरसह गर्डर हे तिथे काम करणाऱ्या कामगारांवर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच सर्वांआधी स्थानिक गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. त्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन टीम, इतर कामगांरानी मिळून क्रेनच्या साह्याने  गर्डर खाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढले. अजूनही ४  ते ५  कामगार गर्डर खाली दबले असल्याची माहिती मिळत आहे. तर  अद्यापही बचावकार्य सुरू असून पोलीस प्रशासन तसेच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल् असून आतापर्यत १७ कामगारांचे  मृतदेह शहापूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी रवाना केले आहे.

दादा भुसे मध्यरात्रीच घटनास्थळी दाखल

मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, अपघातस्थळी भेट देत पाहणीही केली. मुख्यमंत्री महोदयांनी रात्री १ वाजताच मला फोन करुन अपघातासंदर्भातील माहिती देत आदेश दिले. त्यानुसार, ताबतडतोब आम्ही सर्वजण टीमसह घटनास्थळी पोहोचलो. तसेच, २० ते २५ मिनिटांत घटनास्थळी मदतकार्याला सुरूवात झाली होती, असे दादा भुसेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNarendra Modiनरेंद्र मोदीthaneठाणेAccidentअपघात