शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 11:10 IST

PM Narendra Modi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करतील.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 4 वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. शनिवारीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1 लाख 68 हजार 63 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 277 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 69 हजार 959 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या देशात पुन्हा कोरोना वाढत असून सामान्य नागरिक, आरोग्य कर्मचारी, सामान्य नागरिक, संसदेचे कर्मचारी, न्यायालयाचे कर्मचारी आणि न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीत या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुंबईतही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्यामुळे देशातील नागरिकांच्या लसीकरणावर जास्त भर दिला जात आहे. 

शनिवारी झालेल्या बैठकीनंतर नरेंद्र मोदी कोरोनासंदर्भात काय म्हणाले?गेल्या शनिवारी कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. आरोग्य संबंधित विषयांवरील उपाययोजना तसेच लसीकरणाची तयारी, 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत आढावा घेतला. कोरोना आरोग्य सेवा सुरु ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टेलीमेडिसिनची सुविधा वाढवावी असे पंतप्रधान म्हणाले आहेत. देशातील कोरोना संबंधी समस्यांवर निराकरण करण्यासाठी टेलीमेडिसिन सुविधा उपयुक्त ठऱेल, रुग्णांना घरबसल्या डॉक्टरांकडून ऑनलाईन सल्ला मिळेल असे पंतप्रधान म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीOmicron Variantओमायक्रॉन